१९
१ आणि दुसरा देवभाग शिमोनासाठीं, म्हणजे शिमोनाच्या संतानांतल्या वंशासाठीं त्यांच्या कुळांप्रमाणें निघाला; त्यांचे वतन तर यहूदाच्या संतानांतल्या वतनामध्यें झालें. २ आणि त्यांच्या वातनांत गी नगरे त्यांस प्राप्त झाली; बेरशेबा म्हणजे शेबा व मोलादा; ३ आणि हजोर शुवाल व बाला व एजेम; ४ आणि यलतोलाद व बतुल व हर्मा; ५ आणि जीक्लाग व खेथ मार्काबोथ व ह्बोरीसुसा; ६ आणि बेथ लघाबोथ व शारुहेन; असीं नगरें तेरा, आणि त्यांकडले गांव; ७ एनरिम्मोन व एथेर व आशान; असीं नगरें चार, आणि त्यांकडले गांव; ८ म्हणजे या नगरांच्या चहूंकडले जे गांव, ते सर्व बालाथ बरे दक्षिणेचा रामाथ एथपर्यंत; शिमोनाच्या संतानांचे जे त्यांच्या वंशाचें कुलांकुळांप्रमाणें हेंच वतन आहे. ९ शिमोनाच्या संतानांतल्या सुत्रानेमांत झालें; कां तर बहूदाच्या संतानांचा वांटा त्यांस अधिक पडला; यास्तव त्यांच्या वतनामध्यें शिमोनाच्या सनांनांस वतन मिळालें. १० आणि तिसरा देवभाग जबुलुनाच्या संतानांसाठीं त्यांच्या कुलांप्रमाणें निघाला; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत झाली; ११ आणि त्यांची सीमा पश्चिमेकडे, म्हणजे मार्गला तेथवर चढून गेली; मग दाब्बाशेथास पोंहचली; नंतर यकनामाच्यासमोर जो ओहोळ तेथवर पोहंचली. १२ मग सारीद सोडून समोर सूर्याच्या उगवतेस कीस्लोथ ताबोराच्या सिमेपर्यंत फिरली; मग दावराथास जाऊन थाप्या तेथवर चढून गेली. १३ मग तेथून पुढें गीत्ताहेफेराच्या पूर्वेकडून इत्ता काजीन एथवर चालून गेली; मग रिम्मोनमथोवा व नेया सेथपर्यंत गेली; १४ आणि ती सीमा त्याला फेरी चालून उत्तरेस ह्याथोनापर्यंत गेली आणि तिच्या गती इफ्ताहएल खिंडीपर्यंत झाल्या. १५ आणि तींत कट्टाथ व नाह्लाल व शिस्त्रो व इद्ला व बेथलेहेम आदिकरून बारा नगरे, आणि त्यांकडले गांव होते. १६ जबूलुनाच्या संतानांच्या कुळांप्रमाणें त्याचें हेच वतन, तीं नगरें आणि त्यांकडले गांव. १७ इस्साखारासाठीं, म्हणजे इस्साखाराच्या संतानांसाठी त्यांच्या कुळांप्रमाणें चवथा देवभाग निघाला. १८ आणि त्यांच्या सीमेच्या आंत हीं नगरे होती; इस्त्रेल व कसुल्लोय व शेनेम; १९ आणि हफारीम व शियोन व अनाहराथ; २० आणि राब्बिथ व किश्योन व आबेज; २१ आणि रेमेंथ व एनगात्रीम व एनहाद्दाव खेथ पान्जेब, २२ आणि ती सीमा ठाबोर व शाहजिमा व बेथशेमेश एथवर गेली; आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देनेच्या एथें लागला; तीं नगरें सोळा व त्यांकडे गांव. २३ इस्साखाराच्या संतानंतल्या वंशाचें त्यांच्या कुळाप्रमाणें हेच ते वतन, तीं नगरें अनीत त्यांकडले गांव. २४ आणि पांचवा देवभाग आशेराच्या संतानांच्या वंशासाठी त्यांच्या कुळांप्रमाणें निघून आला. २५ म्हणजे त्यांची सीमा असी झाली कीं हेल्काथ व हल्ली व बटेन व आक्षाफ; २६ आणि आल्लाम्मेलेक व आमद व मिशाल, आणि पश्चिमेस कामेल व शिहोरलीबनाथ एथ वर गेली; २७ आणि सूर्याच्या उगवतीस बेथदागोनाकडे फिरली, आणि जबुलुन व इफ्ताहएल खिंड उत्तरेस, व बेथ एमेक व नयेल्यांस पावली, आणि डाव्या हाती काबूलास गेली. २८ आणि एब्रोन व रहोब व हामोन व काना यांस घेऊन मोठ्या सिदोनापर्यत गेली. २९ मग रामा आणि बंदिस्तीचें जोर नगर तिकडे ती सीमा फिरली, नंतर होसा तिकडे सीमा फिरली; आणि तिच्या गती आख्जीबाच्या सीमेवरून समुद्रापर्यंत झाला. ३० आणि उम्मा व अफेक व रहोब तिजकडलीं आहेत; तीं नगरें बाबीस आणि त्याकडले गांव; ३१ आशेराच्या संतानांतल्या वंशाचें त्यांच्या कुळांप्रमाणें हेंच वतन, ती नगरें व त्यांकडले गांव. ३२ नाफ्तालीच्या संतानांविषयीं तर, साहावा देवभाव नाफ्तालीच्या संतानांसाठी त्यांच्या कुळांप्रमाणें निघून आला. ३३ म्हणजे त्यांची सीमा हेलेफ व आल्लोन यांपासून जानात्रीम आणि अदामी नेकेब व याब्नेल यांवरून लाक्कुमापर्यंत गेली; आणि तिच्या गेती यार्देनेपर्यंत झाला. ३४ आणि ती सीमा पश्चिमेस आज्नोथताबारकडे फिरली; मग तेथून हुक्कोकास चालली, आणि दक्षिणेस जबूलुनासीं मिळाली. ३५ आणि तींत बोदेस्तीचीं नगरें हींच; जिद्दीम, जेर व हाम्माथ, राक्काथ व कित्रोरेथ; ३६ आणि अदामा व राम व हाजोर; ३७ आणि केदेश व एद्रेई व एन हाजोर; ३८ आणि इरोन व मिग्दलएल, हारेम व बेथ अनाथ व बेथ शेमेश असीं नगरें एकुणीस आणि त्यांकडले गांव. ३९ नाफुतालीच्या संतानांतच्या वंशाचें त्याला कुळांप्रमाणें हेंच वतन; तीं नगरें आणि त्यांकडले गांव. ४० सातवा देवभाव दानाच्या संतानांतच्या वंशांसाठीं त्याच्या कुळांप्रमाणें निघून आला. ४१ आणि त्यांच्या वतनाच्या सीमेच्या आंत हीं नगरें झाली; जरा व एष्टावोल व शेमेशनगर. ४२ आणि शालाब्बीन व अय्या लोन व इथ्ला; ४३ आणि एलोन व थीस्त्राथा व एक्रोन; ४४ आणि एलतके व गिब्बथोन व बालाथ; ४५ आणि इहुद व खराकाचीं संतानें व गाथरिम्मोन. ४६ आणि भियाकोंन व राक्कोन, यांसुद्धा याफोच्या समोरला कांठ झाला. ४७ आणि दानाच्या संतानांची सीमा त्यांच्या बाहेरहि झाली, कां कीं दानाच्या संतानांचे जे त्यानी चढून लेशेमासीं लढून त्याला धरिलें ; आणि तरवारीने त्याला मारिल्यावर तें वतनाचें करून त्यांत वस्ति केली, आणि आपला पूर्वज दान याच्या नांवाप्रमाणें लेशेमाला दान हटले. ४८ दानाच्या संतानाच्या वंशाचें त्यांच्या कुळांप्रमाणें हेंच वतन, तीं नगरें आणि त्यांकडले गांव. ४९ आणि इस्त्राएलाच्या संतानानी देशाच्या सीमांप्रमाणें वतन करून घेण्याची समाप्ति केल्यावर नुनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्यें वतन दिल्हें. ५० एफ्राइम डोंगरावरलें तिम्नाथसेरा नगर, जें त्याने मागितलें, तें परमेश्र्वराच्या सांगण्याप्रमाणें त्याला दिल्हें; मग तो तें नगर बांधून त्यांत राहिला. ५१ एलाजार याजक व नुनाचा पुत्र यहोशवा व इस्त्राएलाच्या संतानाच्या वंशांतले वडील अधिकारी यानी शिलोमध्यें सभामंडपाच्या दारीं परमेश्वरासमोर, देवखुनेकरून जी वतनें नेमून दिल्हीं तीं तींच; असी त्यांनी देश वांटन्याधी समाप्ती केली.