१८
१ मग शिलोमध्यें इस्राएलाच्या संतानांचा सर्व समुदाय मिळाला, आणि तेथें त्यानी सभामंडप उभा केला, तेव्हां त्यांच्यापुढे देश जिंकलेला झाला. २ तरी जे आपला वतनवांटा पावले नव्हते, असे इस्राएलाच्या संतानांमध्ये सात वंश राहिले होते. ३ यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या संतानांस म्हटलें, जो देश तुमच्या पूर्वजाचा देव परमेश्र्वर याने तुम्हास दिल्हा, तो वसायास जायला तुम्ही कोठपर्यंत आळशी राहाल ? ४ तुम्ही आपल्यासाठीं प्रतीवंशातलीं तीन माणसे द्दा; म्हणजे मी त्यांस पाठवीन, आणि त्यानी उठून देशांत जाऊन त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणें, तो रेखाटून माझ्याजवळ यावें. ५ म्हणजे त्यांनी त्याचे सजत वांटे करावे; यहुशाने दक्षिणेस आपल्या सीमेंत राहावें, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सिमेंत राहावें. ६ तसें तुम्ही देश सात वाट्यानी रेखाटून इकडे माझ्याजवळ आणा; मग एथें आमचा देव परमेश्र्वर यासमोर मी तुमच्यासाठीं देवखून करून घालीन. ७ लेव्यांचा तर तुमच्यामध्यें वांटा नाही; कारण कि परमेश्र्वराचें याजकपण तेंच त्यांचे वतन आहे; आणि गाड व रऊचेन व मनाश्श्याचा अर्धा वंश यांचें, यार्देनेच्या पलिकडे पूर्वेस, जे वतन परमेश्र्वराचा सेवक मोशे याने त्यांस दिल्हें, तें त्यांस मिळालेंच आहे.” ८ तेव्हां तीं माणसें उठून गेलीं, कां कीं यहोशवाने त्या जाणाऱ्यांस देश रेखाटण्याची असी आज्ञा दिल्ही होती कीं, “तुम्ही जाऊन देशांत चालतांना तो रेखाटून माझ्याजवळ परत या; मग मी एथें शिलोमध्यें परमेश्र्वरासमोर तुमच्यासाठीपरमेश्र्वर देवखूणा करून घालीन.” ९ याप्रमाणें तीं माणसें जाऊन देशांत फिरलीं, आणि तो नगरांसुध्दा सातवाटयानी वहींत रेखाटून शिलोंतल्या सैन्यतळात यहोश्वजवळ आलीं. १० मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्यें परमेश्र्वरासमोर देवखुणा करून घातल्या; असें यहोशवाने तेथें तो देश इस्राएलाच्या संतानांच्या वांटण्यांप्रमाणें त्यांस वाटून दिल्हा. ११ तेव्हां बऱ्यामीनाच्या संतानांतल्या वंशाची देवखून त्यांच्या कुळांप्रमणे असो निघाली कीं त्यांच्या देवाची सीमा यहुदाच्या संतानांच्या व योसेफाच्या संतानांच्या मध्यभागीं निघाली. १२ म्हणजे उत्तर बाजूस त्यांची सीमा यार्देनेपासून लागली, मग ती सीमा यरीहोंच्या उत्तरभागी चढून गेली, नंतर पश्चिमेकडे डोंगरावर चडली, आणि तिच्या गती बेथवेनापर्यंत रानांत झाला. १३ मग तेथून लुजाकडे, लूज तेंच बेथएल त्याच्या दक्षिणभागीं तो सीमा गेली; मग खालच्या बेथहोरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे आटरोथ आदर तेथवर ती सीमा उत्तरलीं १४ नंतर ती सीमा पश्चिम बाजूस दक्षिणेकडे वळून बेथहोरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून अंकली गेली; आणि किर्याथबाल तोच किर्याथयारीम यहुदाच्या संतानांचे नगर, तेथवर तिच्या गती झाल्या; असी पश्चिम बाजु. १५ आणि दक्षिण बाजू किर्याथयारीमाच्या शेवटापासून लागली; आणि ती सीमा पच्शिमेकडे चालून नेफतोहा पाण्याच्या झेऱ्याकडे गेली. १६ मग ती सीमा हित्रोमाच्या पुत्राच्या खिडीसमोरला डोंगर, जो रफायांच्या तलवटीच्या उत्तरेस, त्याच्या कंठी उतरली, आणि यबूस्यांच्या दक्षिण भागी हित्रोम खिंडीत उतरून खालीं एनरोगेलाकडे गेली. १७ मग उत्तरेकडे अंकली जाऊन एनशेमोसकडे गेली, आणि अदुम्मिम चढणेच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचें संतान बोहान याच्या धोडीकडे उतरली. १८ मगबा याच्या समोरल्या भागीं उत्तरेस जाऊन भराब्यास उतरली. १९ मग ती सीमा बेथ ह्ग्लाच्या गती खारट समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत याद्रेनेच्या शेवटीं दक्षिणेस झाला; असी दक्षिणसीमा. २० आणि पुर्वबाजूस त्याची सीमा यार्देन झाली; बयामिनाच्या संतानांतल्या कुळावरून त्याचें वतन आपल्या चहुंकडल्या संतानांतल्या सीमाप्रमाणे हेंच. २१ आणि खन्यामीनाच्या संतानांतल्या वंशांला त्यांच्या कुलाप्रमाणे हीं नगरें प्राप्त झाली; यरिहो व बेथह्ग्ला व तलवतिचें क्जीज; २२ आणि बेथ अराबा व जमाराइम व बेथएल; २३ आणि आव्वीम व पारा व आफ्रा; २४ आणि खपार आम्मोना व अफ्णी व गाबा; असीं नगरें बारा, आणि त्याकडले गांव; २५ गिबोन व रामा व बेरोथ; २६ आणि मिजुपे व कफीरा व मोजा; २७ आणि रेकेम व इर्पेल व थारला; २८ आणि जेला, एलफ व यबूसी तेंच यरूशालेम, गिबाथ, किर्याथ; असीं नगरें चवदा, आणि त्यांकडले गांव; बन्यामिनाच्या संतानांतल्या कुळांप्रमाणें त्यांचें हेंच वतन.