१७
१ आणि मनाश्ये तो योसेफाचा प्रथम पुत्र, यास्तच त्याच्या वंशाला, म्हणजे मनाश्श्याचा प्रथम पुत्र माखीर गीलदाचा बाप याला देवभाग प्राप्त झाला; हा तर मोठा शूर होता, आणि त्याला गीलदार व खाशान असा भाग प्राप्त झाला. २ मनाश्श्याच्या राहिलेल्या संतानंसही त्याच्या कुळाप्रमाणें विभाग प्राप्त झाला, म्हणजे अवियेजेराचीं संतानें व हेलेकाचीं संताने व आशियेलाचीं संताने व शेखेमाचीं संतानें व हेफेराचीं संताना व शमीदा यांची संतानें यांस प्राप्त झाला: गोसेफाचा पत्र जो मनाश्ये त्यापासून जें परुष उत्पन्न झाले ते कुळांकुळांप्रमाणें असे आहेत. ३ मनाश्शाचा पुत्र माखीर, याचा पुत्र गिलाद, याचा पुत्र हेफेर, याचा पुत्र सलफहात, याला तर नव्हते, परंतु कन्या होत्या; आणि त्याच्या कण्यांचीं नावें हीच, महला व नोवा, ह्ग्ला, मिल्का व थिर्जा. ४ आणि एलाजार याजक व नुनाचा पुत्र यहोशवा व अधिकारी यांपुढें त्या येऊन बोलल्या, “परमेश्र्वराने मोश्याला असी आज्ञा दिल्ही की आद्दास आमच्या भावांबदांमध्यें वतन द्दावें.” यास्तव त्याने परमेश्र्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यांस त्यांच्या बापाच्या भावांबदांमध्यें वतन दिल्हें. ५ आणि यार्देंनेच्या पलिकडे जे गीलदार व बाषण त्या प्रांताखेरीज मनाश्श्याचे सुत्रनेमित दाहा भाग प्राप्त झाले. ६ कारण कीं मनाश्श्याच्या वंनशांतल्या कन्यांस त्याच्या संतांनामध्ये वतन मिळालें, आणि मनाश्श्याच्या इतर संतानांस गिलाद प्रांत प्राप्त झाला होता. ७ आणि मनाश्श्याची सीमा आशेरापासून शखेमाच्या समोरल्या भिख्माथाथापर्यंत झाली, आणि ती सीमा एनतापुहाच्या राहणाऱ्यांच्या उजव्या भागापर्यंत पोहंचली. ८ ताप्पूहा प्रांत मनाश्श्याचा, परंतु मनाश्श्याच्या सीमेजवळचें ताप्पुहा नगर एफ्राइमाच्या संतानांचे झालें. ९ आणि सीमा काना ओढ्यावरून ओढ्याच्या दक्षिणेस उतरली; एफ्राइमाचींहि कित्येक नगरें मनाश्श्याच्या नगरांमध्ये होती; तरी मनाश्श्याची सीमा ओड्याच्या उत्तरेस होती, आणि तिच्या गती समुद्राप्रर्यंत झाल्या. १० दक्षिणभाग एफ्राइमाचा, आणि उत्तरभाग मनाश्श्याचा, आणि समुंद त्याच्या सीमेचा झाला, आणि उत्तरेस आशराच्या ठायीं व पूर्वेस इस्साखाराच्या ठायीं ते एकत्र झाले. ११ आणि इस्साखारांत व आशेरांत बेथशान व तिजकडलीं खेडीं, आणि इबलाम व त्याकडलीं खेडीं, आणि दोर व त्याकडलीं खेडीं यांतले राहणारे, आणि एनदोर व त्यांकडलीं खेडीं यांतले राहणारे, आणि थानाख व त्यांकडलीं खेडीं यांतले राहणारे, आणि मागीदो व त्यांकडलीं खेडीं यांतले राहणारे, हे तीन परगणे मनाश्श्याचे झाले. १२ तथापि या नगरांचा मोड करायला मनाश्श्याचीं संताने समर्थ नव्हतीं; याप्रातांत राहायास खानान्यानी तर निग्रह धरिला. १३ तरी असें झालें कीं जेव्हां इस्राएलाचीं संतानें बळकट झाली, तेव्हां त्यांनी खनान्यांचा अगदीं मोड न करून त्यापासून कर घेतला. १४ तेव्हा योसेफाच्या संतानानी यहोशवाला असें हटलें कीं, “ त्वा मला वतनासाठीं एकच देवभाग म्हणजे एकच सुत्रप्रदेश कां दिल्हा? मी तर मोठा लोक; परमेश्वराने मला अनेक प्रकारांचा अशीर्वाद दिल्हा आहे.” १५ तेव्हां यहोशवाने त्यांस म्हंटले, “ जर तूं मोठा लोक अणखी एफ्राइम डोंगरावर तुला संकोच झाला आहे, तर तूं आपल्या अरण्यांत चढून जा, आणि तेथें परिज्जी व शफाई यांच्या देशांत आपल्यासाठी तोडून टाक.” १६ नंतर योसेफाच्या संतानानानी ह्याटले, “डोंगरवट आह्यस पुरत नाहीं; आणि जे खनानी तळप्रांतीं राहतात, त्या सर्वांस लोखंडी रथ आहेत; म्हणजे बेथशान व तिजकडलीं खेडीं यांतले, आणि इस्त्रेल त्ल्व्त इंतले जे, त्यांस आहेत.” १७ तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम व मनाश्ये यांस असें म्हटलें कीं, “तूं मोठा लोक, तुझी शक्तीही मोठी आहे; तुला एकच देवभाग नसावा; १८ याकरितां डोंगरवट तुला तोडसील, त्याचे बाहेरले भागही तुझे होतील, खनान्यांस जरी लोखंडी रथ आणखी ते बळकट, तरी तूं त्यांचा पराजय करसील.”