९०
१ प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस. २ देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील. ३ तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस. ४ तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र. ५ तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत. ६ गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाळते व मरणाला टेकते. ७ देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते. ८ तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे. देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस. ९ तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते. १० आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो. ११ देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे. १२ आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू. १३ परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग. १४ तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे. १५ तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस. आता आम्हांला सुखी कर. १६ तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु शकतोस ते त्यांना बघू दे. १७ देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.