३
१ परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत. खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत. २ बरेच लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ते लोक म्हणतात, “देव त्याला वाचवणार नाही.” ३ परंतु परमेश्वरा, तूच माझी ढाल आहेस तूच माझे वैभव आहेस परमेश्वरा मला महत्वदेणारा तूच आहेस. ४ मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल! ५ मी पडून विश्रांती घेतो तरी मी जागा होईन हे मला माहीत आहे. मला हे कसे कळते? कारण परमेश्वर मला सांभाळतो माझे रक्षण करतो. ६ माझ्याभोवती हजारो सैनिक असतील. परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही. ७ परमेश्वरा जागा हो! देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस तू जरमाझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस तर त्यांचे सगळे दात पडतील. ८ परमेश्वरा, जय तुझाच आहे. परमेश्वरा तू कृपा करून तुझ्या लोकांवर दया कर.