११
१ याबीन राजा व त्याच्याशीं दोस्ती करणारे राजे ह्यांचा पराभव हसोराचा राजा याबीन ह्यानें हें ऐकल्यावर सादोनाचा राजा योबाब आणि शिम्रोनाचा राजा व अक्षाफाचा राजा ह्यांना, २ तसेंच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत, कित्रेरोथाच्या दक्षीणेकडील अराबांत. तालवटींत आणि पश्चिमेकडील नाफोत-दोरांत असलेल्या राजांना. ३ आणि पुर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, तसेंच अमोरी, हित्ती, परीज्जी व डोंगरवटींतले युवसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतांत राहणारे हिव्वी ह्यांना बोलावणे पाठविलें. ४ तेव्हां ते सगळे आपआपल्या सेनचा समुद्रकिनांऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले त्यांच्याबरोबर पुष्कळ घोडे व रथ होते. ५ ह्या सर्व राजांनी एकत्र जमून इस्राएलाशी लढण्यासाठी मेरोम सरोवराजवळ तळ दिला. ६ मग परमेश्वर यहोशवा म्हणाला, त्यांना भिऊं नको; कारण उद्दा मी ह्याच वेळीं ते सर्व कापून काढलेले इस्राएलाच्या हाती देईन; त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडून तक व त्यांचे रथ अग्नींत जाळून टाक. ७ तेव्हां यहोशवा आपल्या सर्व योद्धयांसह मेरोम सरोवरापाशी अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला. ८ परमेश्वरानें त्यांना इस्राएलाच्या हाती दिलें; त्यांनी त्यांना मार देऊन सिदोन महानगरापर्यंत व मिस्त्रफोथ—माईमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पे खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांच्या एवढा संहार केला कीं त्यांतला एकहि जिवंत राहिला नाहीं. ९ परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणें यहोशवानें केलें, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या धोंडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नींत जाळून टाकले. १० त्या समयीं यहोशवानें मागें परतून हासोर घेतलें, व त्याच्या राजाला तरवारीनें ठार मारलें. पूर्वी हासोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होतें. ११ तेथल्या सर्व प्राण्यांना त्यांनीं तरवारीनें ठार मारून त्यांचा समूळ नाश केला; कोणताहि प्राणी जिवंत ठेवला नाही; आणि त्यानें हासोर नगरला आग लाबून तें जाळून टाकलें. १२ परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणें यहोशवानें त्या राजांची सर्व नगरे सर्व राजंसह हस्तगत करून त्यांना तरवारीनें ठार मारलें व त्यांचा समूळ नाश केला. १३ टेकड्यांवर वसलेलीं कोणतींही नगरें इस्राएलांने जाळलीं नाहीत; हसोर मात्र यहोशवानें जाळलें. १४ ह्या नगरांतील सर्व मालमत्ता व गुरेंढोरें इस्राएल लोकांनीं लुटून नेलीं, पण त्यांनी तरवार चालवून प्रत्येक माणूस मारून टाकला, एकहि प्राणी जिवंत ठेवला नाही. १५ परमेश्वरानें आपला सेवक मोशे ह्याला आज्ञा केल्याप्रमाणें मोशेनें यहोशवाला आज्ञा केली; आणि त्याप्रमाणें यहोशवानें केले. परमेश्वरानें मोशेला आज्ञापिलेली कोणतीही गोष्ट करण्याचें त्यानें सोडलें नाहीं. याहोश्व सबंध देश पावात्र्कांत करतो १६ अशा प्रकारें यहोशवानें डोंगरी मुलुख, सर्व नेगेब, सर्व गोशेन प्रांत, तळवट, १७ तसेंच सेईरच्या वाटेवरील हालाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशीं असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यांतील बाल-गाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्यानें हस्तगत केला; त्यांच्या सर्व राजांना त्यानें धरून ठार मारलें. १८ त्या सर्व राजांशीं यहोशवानें पुष्कळ दिवस युद्ध केलें. १९ गिबोनांत राहणाऱ्या हिव्व्याखेरीज कोणत्याही नगरानें इस्राएल लोकांशीं तह केला नाही; ती सर्व त्यांनी लढून घेतलीं, २० कारण परमेश्वराचा असा हेतू होता कीं, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणें त्यांचा सुमुळ नाश करावा, आणि त्यांना कांहींच दयामाया न दाखवितां त्यांचा संहार करावा. त्यांनीं इस्राएलशीं युद्ध करावयाला बाहेर पडावें म्हणून त्यानें त्यांचीं मानें कठीण केलीं. २१ त्या वेळीं यहोशवानें डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या व इस्राएलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या आणकी लोकांचा उच्छेद, केला. यहोशवानें त्याचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. २२ इस्राएल लोकांच्या देशांत एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गठ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले. २३ परमेश्वरानें मोशेला सांगितलें होतें त्याप्रमाणें यहोशवानें सर्व देश काबीज केला. यहोशवानें तो इस्राएलाला त्याच्या वंशांच्या हिश्श्याप्रमाणें वतन म्हणून वाटून दिला; तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.