१०
१ अमोरी लोकांचा पराभव यहोशवानें आय नगर घेऊन त्याचा समूळ नाश केला, आणि जसें त्यानें यरीहोचें व त्याच्या राजाचें केलें तसेंच आय नगराचें व त्याच्या राजाचें केलें, पण गीबोनाचे रहिवासी इस्राएल लोकांशीं ठ करून त्यांच्यामध्यें आहेत, हे सर्व यरुशलेमेचा राजा अदोनीसदेक ह्यानें एकलें, २ तेव्हां त्याला फार भीती वाटली, कारण गिबोन हें मोठें शहर असून एखाद्दा राजधानिसारखें होतें. ते आय नगरापेक्षां मोठें असून तेथलें सगळे पुरुष बलाढ्य होते. ३ मग यरुशलेमेचा राजा अदोनिसदेक ह्यानें हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मुथाचा राजा पिराम, लाखीशाचा राजा याफिय आणि एग्लोनाचा राजा दबीर ह्यांना निरोप पाठविला कीं, ४ माझ्याकडे येऊन मला कुमक द्दा, आपण गिबोनाला मार देऊं; कारण त्यानें यहोशवाशीं व इस्राएल लोकांशीं तह केला आहें. ५ तेव्हां यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पांच अमोरी राजांनीं एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यांसह चढाई केली आणि गिबोनासमोर तळ देऊन ते त्यांच्याशीं लढूं लागले. ६ हें पाहून गिबोनांतल्या माणसांनीं गीलगालच्या छावणींत यहोशवाला निरोप केला कीं, आपल्या दासांवरला मदतीचा हात आखडता घेऊं नको ; आमच्याकडे लवकर येऊन आमचा बचाव कर व आम्हांला मदत कर; कारण डोंगरवटींतले सर्व आमोरी राजे एकत्र रमून आमच्यावर चालून आले आहेत ७ तेव्हां यहोशवा आपले सर्व योद्धे व शूर वीर ह्यांना बरोबर घेऊन गिलगाल येथून निघाला. ८ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिऊं नको; कारण मीं त्यांना तुझ्या हातीं दिलें आहे; त्यांतला कोणीहि तुझ्यापु्ढें टिकणार नाही. ९ यहोशवा रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकीं चाल करून आला १० परमेश्वरानें इस्राएलापुढें त्यांची गाळण उडविली. त्यांनीं गिबोनापाशीं त्यांची मोठी कत्तल करून बेथ-होरोनाच्या चढावाच्या वाटेनें त्यांचा पाठलाग केला आणि अजेका व म्क्केदा येथपर्यंत ते त्यांना मारीत गेले. ११ ते इस्राएलापुढून बेथ-होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असतांना परमेश्वरानें अजेकापर्यंत आकाशांतून त्यांचावर केलेल्या मोठाल्या गारांच्या वर्षावामुळें ते ठार झाले. इस्राएल लोकांनीं तरवारीनें मारले त्यांपेक्षां जास्त लोक गोरांनी मेले. १२ परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हातीं दिलें त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असें म्हणाला. हे सूर्या, तूं गीबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तूं अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. १३ तेव्हा राष्ट्रानें आपल्या शत्रूंचे पुरें उसनें फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात हि कथा लिहिली आहे ना ? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारें एक संपूर्ण दिवस थांबला ; त्यानें अंस्तास जाण्याची घाई केली नाहीं. १४ असा दिवस त्यापूर्वी किवा त्यानंतरहि आला नाही; त्या दिवशीं परमेश्वरानें मानवाचा शब्द ऐकला, करण परमेश्वर इस्राएलासाठी लढत होता. १५ मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परत आला. १६ ते पांच राजे पळून जाऊन मक्केदा येथील एका गुहेंत लपून बसले. १७ मक्केदा येथील गुहेत ते पांच राजे लपलेले सांपडले आहेत असे यहोशवाला कोणीं कळविलें १८ तेव्हां यहोशवा म्हणाला, गुहेच्या तोंडावर मोठमोठे धोंडे लोटा आणि तिच्यावर माणसांचा फार बसवा. १९ पण तुम्ही स्वतः तेथें थांबूं नका; आपल्या शत्रूंचा पाठलाग करा; त्यांच्या पिछाडीच्या लोकांना ठार मारा; त्यांना त्यांच्या नगरांना पोहंचू देऊ नका; कारण तुमचा देव परमेश्वर ह्यानें त्यांना तुमच्या हाती दिलें आहे. २० यहोशवा आणि इस्राएल लोक ह्यांनी त्यांची मोठी कत्तल करून त्यांचा नाश करण्याचें काम संपविलें ; पण त्यांतले कांहीं लोक बचावून तटबंदीच्या नगरांत गेले. २१ मग सर्व लोक मक्केदाच्या छावणीस यहोशवा कडे आले; इस्राएल लोकांपैकी एकाहिविरुद्ध कोणी ब्र शब्द काढला नाही. २२ मग यहोशवा म्हणाला, गुहेचें तोंड उघडून त्या पंच राजांना तेथून माझ्याकडे घेऊन या. २३ त्याप्रमाणें त्यांनी केलें म्हणजे यरुशलेमेचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुथाचा राजा, लाखीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा ह्या पंच राजांना त्यांनी गुहेंतून काढून त्याच्याकडे आणलें. २४ ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हां त्याने सर्व इस्राएल पुरुषांना बोलावून आणलें. मग तो आपल्याबरोबर स्वारीवर गेलेल्या योध्दयांच्या नायकांना म्हणाला, पुढें येऊन त्यांच्या मानांवर पाय द्दा. तेव्हां त्यांनी पुढें येऊन त्यांच्या मानांवर पाय दिले. २५ यहोशवा त्यांना म्हणाला, भिऊं नका, कचरूं नका, खंबीर व्हा, हिमत धरा; कारण ज्यांच्याशीं तुम्ही लढाल त्या तुमच्या सर्व शत्रूंचें परमेश्वर असेंच करील. २६ नंतर यहोशवा त्यांना ठार मारवून पांच झाडांवर त्यांना टांगलें, आणि ते संध्याकाळपर्यंत त्या झाडांवर लचकत राहिले . २७ सूर्यास्तसमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरविलें आणि ज्या गुहेंत ते लपले होते तिच्यांत त्यांना टाकलें आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. आजपर्यंत ते तसेच आहेत. २८ त्या दिवशीं यहोशवानें मक्केदा घेऊन तरवारीनें त्याच व त्याच्या राजाचा संहार केला; त्यांच्याबरोबर तेथल्या सगळ्या प्राणांचाही त्यानें समूळ नाश केला; त्यानें कोणालाहि जिवंत ठेवलें नाही. त्यांने यरीहोच्या राजाचें जें केलें तेंच मक्केदाच्या राजाचेंहि केलें. २९ मग मक्केदाहून निघून सर्व इस्राएलास बरोबर घेऊन यहोशवा लीब्नावर चालून गेला व त्याशीं लढला; ३० परमेश्वरानें तें नगर व त्याचा राजा ह्यांना इस्राएलाच्या हाती दिलें आणि यहोशवानें त्याचा व त्या न्ग्रंतल्या सर्व प्राण्यांचा तरवारीनें संहार केला; त्यांतला कोनालाही जिवंत ठेवलें नाही ; यरीहोच्या राजाचें त्यानें जें केलें तेंच येथल्याहि राजाचें केले. ३१ त्यानंतर लीब्ना सोडून सर्व इस्राएलासह यहोशवा लाखीशावर चालून गेला आणि त्यासमोर तळ देऊन त्याशी लढला. ३२ परमेश्वरानें लाखीश इस्राएलाच्या हाती दिलें व त्यांनीं तें दुसऱ्या दिवशीं घेतलें, लीब्नाचा केला तसाच लाखीशाचा व तेथल्या सगळ्या प्राण्यांचा त्यानें तरवारीनें संहार केला. ३३ तेव्हा गेजेराचा राजा होरम लाखीशाला कुमक देण्यासाठी चालून आला, पण यहोशवानें त्याचा व त्याचा लोकांचा एवढा संहार केला की त्यांतला एकहि जिवंत राहिला नाहीं. ३४ मग लाखीश सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह एग्लोनावर चालून गेला; त्यासमोर तळ देऊन ते त्याशी लढले. ३५ त्याच दिवशी त्यांनीं तें घेतलें आणि तरवारीनें त्यांचा संहार केला; लाखीशांतल्याप्रमाणें तेथील सगळ्या प्राण्यांचा त्या दिवशी त्यानें समूळ नाश केला. ३६ मग एग्लोन सोडून यहोशवा सर्व इस्राएलासह हेब्रोनावर चढाई करून गेला. आणि ते त्याशी लढले; ३७ त्यांनी तें घेतलें आणि तें नगर, त्यचा राजा, त्याची सर्व उपनगरें आणि त्यांतले सर्व प्राणी ह्यांचा तरवारीनें संहार केला; यहोशवानें एग्लोनां-तल्याप्रमाणेंच येथेंही कोणाला जिवंत राहू दिलें नाही. त्यानें त्याचा आणि त्यांतल्या सर्व प्राण्यांचा समूळ नाश केला. ३८ नंतर यहोशवा सर्व इस्राएलासह मागें वळून दबिराव चालून गेला आणि त्याशीं लढला ३९ त्यानें तें, तेथला राजा व त्याची सर्व उपनगरें हस्तगत करून त्यंचा तरवारीनें संहार केला. तेथील सर्व प्राण्यांचा त्यानें समूळ नश केला. कोणाला जिवंत राहू दिलें नाहीं हेब्रोनाचें लीब्ना व त्याचा राजा ह्यांचें त्यानें जें केलें तेंच डबीर व त्याचा राजा ह्यांचेही केलें. ४० ह्या प्रकारें यहोशवाने त्या सर्व देशाचा म्हणजे डोंगराळ प्रदेश, नगेव, तलवट व उतरण ह्यातील सर्व प्रांत आणि त्यांचे राजे ह्याचा धुव्वा उडविला; कोणालाही जिवंत राहू देले नाही; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्यानें आज्ञा केल्याप्रमाणें सर्व प्राण्यांचा त्याने समूळ नाश केला ४१ यहोशवानें कादेशबर्ण्यापासून गज्जापर्यंतचा मुलुख व गिबोनापर्यंतचा सर्व गोशेन प्रांत ह्यांत त्यांचे धुव्वा उडविला. ४२ हे सर्व राजे व त्यांचे देश यहोशवानें एकाच वेळेस घेतले, कारण इस्राएलाचा देव परमेश्वर इस्राएलातर्फें लढला. ४३ मग यहोशवा सर्व इस्राएलासह गिलगाल येथील छावणीकडे परतला.