८
१ आय नगराचा पाडाव आणि नाश परमेश्वर यहोशवला म्हणाला, भिऊं नको, कचरूं नको; उठ, सर्व योद्धे बरोबर घेऊन आय नगराचा राजा, त्याची प्रज्ञा, त्यचे नगर आणि त्याचा देश मी तुज्या हाती दिला आहे; २ यरीहो आणि त्याचा राजा ह्यांचे तू केले तेच आय व त्याचा राजा ह्यांचे कर; मात्र तेथली होती लागेल ती मालमता व गुरेंढोरें तुम्ही आपणासाठी लुटम्हणून घ्या; नगरच्या पिछाडीस सैन्याला दबा धरून बसव. ३ त्याप्रमाणें यहोशवनें सर्व योद्धासंह आय नगरावर चढाई करून जाण्याची तयारी केली; त्यानें तीस हजार पराक्रमी वीर निवडून रातोरात पाठविले. ४ त्याने त्यांना अशी आज्ञा केली कि, एका ; नगरच्या पिछाडीस जाऊन नगरावर दबा धरून बसा; नगरापासून फार दूर जाऊ नका, पण तुम्ही सर्व तयार राहा. ५ मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊं. आणि ते पूर्वीप्रमाणें आमच्यावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्या समोरून पळूं लागूं. ६ आम्ही त्यांना चालीवीत चालीवीत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील कारण त्यांना वाटेल, पुर्विप्रमाणेंनच आपल्याला भिऊन हे पळ काढतीत आहेत. ह्याप्रमाणें आम्ही त्यांच्यापुढें पळूं लागूं ; ७ मग तुम्ही दबा धरणाऱ्यानीं उठून नगर काबीज करावें; कारण तुमचा देव परमेश्वर तें तुमच्या हातीं देणार आहे. ८ तुम्ही तें नगर हस्तगत केल्यावर त्याला आग लावा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणें करा ; पहा, मी तुम्हांला आज्ञा केली आहे. ९ मग यहोशवानें त्यांना रवाना केलें. ते आयच्या पश्चिम बाजूला बेठेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच राहिला. १० यहोशवानें मोठ्या पहाटेस उठून लोक जमविले आणि तो व इस्राएलांचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगरकडे निघाले. ११ त्यांच्याबरोबर सर्व योद्धे चढाई करावयाला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला ; ते व आय नगर ह्यांच्यामध्यें एक खोरें होतें. १२ त्याने सुमारे पाच हजार परुष आय नगरच्या पश्चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरावयला ठेवले. १३ ह्याप्रमाणे नगरांच्या उत्तरेस कोणतें सैन्य जावयाचें आणि पश्चिमेस कोणी दबा धरावयाचा हें ठरवून यहोशवा त्या रात्रीं त्या खोऱ्यांत राहिला. १४ आयच्या राजानें हें पहिले तेव्हा तो व त्याचा नगरातले सगळे लोक पाहटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करावयाला अराबासमोरील उताराकडे गेले पण नगरच्या पिछाडीस लोक आपणावर दबा धरून आहेत हें त्याच्या गावीही नव्हतें. १५ मग यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे मिष करून रानाच्या वाटेनें पळूं लागले. १६ त्यांच्या पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना यकत्र बोलावण्यांत आले ; ते यहोशवाचा पाठलाग करीत नगरापासून दूरवर गी. १७ इस्राएलाच पाठलाग करायला निघाला नाही असा कोणी पुरुष आय किवा बेथेल येथें राहिला नाही; त्यांनी तें नगर खुलें टाकून इस्राएलाचा पाठलाग केला. १८ तेव्हां परमेश्वर यहोशवाला म्हणाला, तुज्या हाती असलेली बरची आय नगरकडे नगर, कारण ते मी तुज्या हाती देईन त्याप्रमाने यहोशवानें आपल्या हाती असलेल्यी क्ष्र्चि नगरकडे उगारली. १९ त्यानें आपला हात उगारतांच दबा धरणाऱ्यांनी लगबगीनें उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते कबीर केलें आणि लगेच नगरला आग लोवली. २० आय नगरच्या पुरूषांनी मागें वळून पहिलें तो नगराचा धूर आकाशांत चढतांना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किवा तिकडे पळण्याची ताकत राहिली नाही ; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते इ आपला पाठलाग करणाऱ्यांवर उलटले. २१ दवा धरणार्यांनी नगर हस्तगत केल्याचें व त्याचा धुरवर चढत असल्याचें यहोशवा व सर्व इस्राएलानें पाहिलें तेव्हा ते मागें उलटून आयकरावर तुटून पडले. २२ त्याच्याशी सामना करावयाला ती दुसरी टोळीहि नगरांतून निघाली; असे ते दोहों बाजूनीं इस्राएलाच्या कचाटींत सांपडले; इस्राएलानें त्यांचा क्न्हार केला; त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाजी किवा निसटून गेला नाही. २३ आय नगरच्या राजाला त्यांनीं जिवंत धरुन यहोशवाकडे आणलें. २४ ज्या मोकळ्या रानांत इस्राएलांनी आयकरांचा पाठलाग केला होता तेथें त्यांनी त्या सर्वांची कत्तल केली आणि तरवारीनें त्यांचा साफ फडशा उडविली. २५ त्या दिवशीं आय नगरांतलीं सगळी माणसें पडलीं सर्व स्त्रीपुरुष मिळून ती बारा हरार होतीं. २६ आय येथील सर्व रहिवाश्यांचा समुळ नाश होइपर्यंत यहोशवानें नगराकडे बरची उगारलेला आपला हात मागें घेतला नाही. २७ परमेश्वरानें यहोशवाला आज्ञा केल्याप्रमाणें इस्राएलांनी त्या नगरांतली गुरेंढोरें व इतर मालमत्ता मात्र स्वतःसाठी लुट म्हणून घेतली. २८ तेव्हां यहोशवानें आय नगर जाळून टाकलें व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला ; आजपर्यंत तो तसाच आहे. २९ आय नगरच्या राजाला त्यानें संध्याकाळपर्यंत झाडावर फाशीं दिलें व सूर्यास्ताच्या वेळीं यहोशवाच्या आज्ञेनें त्यांनीं त्याचें प्रेत झाडावरून उतरून नगरच्या वेशीजवळ टाकलें आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली ; ती आजपर्यंत आहे. एबाल डोंगरावर लिहिण्यंत आलेले नियम ३० मग यहोशवानें इस्राएलाचादेव परमेश्वर ह्याच्यासाठीं एबाल डोंगरावर एक वेदी बांधली; ३१ परमेश्वराचा सेवक मोशे ह्यानें इस्राएल लोकांना आज्ञा केल्याप्रमाणें, अर्थात् मोशेच्या नियशास्त्राच्या ग्रंथांत लिहिल्याप्रमाणें त्याने न घडलेल्या दगडांची वेदी बांधल्यी; त्या दगडांना लोखंडाचा स्पर्श देखील झाला नव्हता. त्या वेदीवर त्यांनी परमेश्वराला होमबली अपिले आणि शांत्यर्पनें वाहिलीं. ३२ तेथें इस्राएल लोकांदेखत यहोशवानें त्या दगडांवर मोशेनें लिहिलेल्या नियमशास्त्राची नक्कल लीगुन काढली. ३३ परमेश्वरानें कराराचा कोश वाहणाऱ्या लेवील योजकांसमोर सर्व इस्राएल, त्यांचे वडील, अमलदार आणि न्यायाधीश तसेच देशांत जन्मलेले आणि उपरी हे कोशाच्या उजवीकडे व डावीकडे उभे राहिले. इस्राएल लोकांना प्रथम आशीर्वाद देण्यासंबंधीं परमेश्वराचा सेवक मोशे ह्यानें पूर्वी जी आज्ञा दिली होती, त्याप्रमाणें निम्मे लोक गरीज्जीम डोंगरासमोर व निम्मे एबाल डोंगरासमोर उभे राहिले. ३४ त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेलीं आशीर्वाडची व शापाशी सर्व वचनें त्यानें वाचून दाखविली. ३५ इस्राएलांच्या संबध मंडळीसमोर व त्यांच्या स्त्रिया, मुलेंबालें व त्यांच्यामध्यें राहणारे उपरी ह्याच्यासमोर मोशेनें दिलेल्या सगळ्या आज्ञा यहोशवानें वाचून दाखविल्या ; त्यातला एकही शब्द त्यानें गाळला नाहीं.