७
१ आखानाचें पातक इस्त्राएल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतींत विश्वासघात केला; यहूदा वंशांतील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह ह्यानें समर्पित वस्तूंपैकीं काहीं ठेवून घेतल्या, म्हणून इस्त्राएल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. २ बेथेलच्या पूर्वेस बेथ-आवेनाजवळ आय नगर आहे तिकडे यहोशवानें यरीहोहून माणकें पाठविलीं आणि त्यांना सांगितलें कीं, जा, तो देश हेरा. तेव्हां त्यांनीं जाऊन आय हेरलें, ३ नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणालें, सर्व लोकांना तेथें जावयाला नको, फक्त दोन-तीन हजार पुरूषांनीं जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथें सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाहीं; कारण ते लोक थोडकेच आहेत; ४ म्हणून लोकांतले सुमारें तीन हजार पुरूष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढें त्यांना पळ काढावा लागला. ५ आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारें छत्तीस माणसें मारून टाकलीं आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारीत नेलें; त्यामुळें लोकांच्या काळजाचें पाणीपाणी झालें. ६ यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्त्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यत परमेश्वराच्या कोशापुढें पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली. ७ यहोशवा म्हणाला, हायहाय। हे प्रभु परमेश्वरा; आम्हाला अमो-यांच्या हातीं देऊन आमचा नाश करायला तूं ही प्रजा यार्देनेपार कां आणलीस? आम्ही समाधान मानून यार्देनपलीकडेच राहिलो असतों तर किती बरें झालें असतें। ८ हे प्रभो, इस्त्राएलानें आपल्या शत्रूंना पाठ दाखविली; आतां मी काय बोलूं? ९ कारण कनानी लोक आणि देशांतले सर्व रहिवासी हें ऐकून आम्हाला घेरतील आणि पृथ्वीवरून आमचें नांव नाहीसें करतील; तेव्हां तूं आपलें थोर नांव राखण्यासाठी काय करणार आहेस? १० तेव्हां परमेश्वर यहोशवाला म्हणाला ऊठ, असा पालथा कां पडलास? ११ इस्त्राएलानें पाप केलें आहे; मी त्यांच्याशीं केलेला करार त्यांनीं मोडला आहे; समर्पित वस्तुपैकी कांहीं त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीहि केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत. १२ म्हणून इस्राएल लोकांना आपल्या शत्रूंपुढें टिकाव धरत नाही, ते आपल्या शत्रुंणा पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आह्हेत; तुमच्यामधून त्याल समर्पित वस्तु नष्ट केल्याशिवाय येथून पुढें मी तुमच्याबरोबर राहणार नाही. १३ तर उठ, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग : उद्यांसाठी तुम्ही शुद्ध व्हा, कारण इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायेला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत, तुम्च्यांतून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रुंनपुढें तुमचा टिकाव लागणार नाही. १४ सकाळीं तुम्हाला आपआपळ्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल ; मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका कुळाने पुढे यावें; नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळांतील एकाएका घराण्यानें पुढें यावे ; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाला पुढे यावें; १५ ज्याच्याजवळ समर्पित वस्तु सापडतील त्याल त्याच्या सर्वस्वासह अग्नीनें जाळून टाकावें, कारण त्यानें परमेश्वराचा करार मोडला आहे, आणि इस्राएलमध्यें मूर्खपणा केला आहे. १६ यहोशवानें मोठ्या पाहटेस उठून इस्राएलम एकाएका वंश समोर आणला, तेव्हां यहूदा वंश पकडला गेला. १७ मग त्यांने यहूदाचीं कुळें समोर आणली, तेव्हां जेरह कुल पकडलें गेलें. नंतर जेरहाच्या कुळांतलीं घरन समोर आणण्यांत आली. तेव्हां जब्दीचें घराणें पकडले गेले. १८ मग त्याच्या घराण्यांतील प्रत्येक पुरुषाला समोर आणण्यात आलें. तेव्हा यहूदा वंशांतील आखन बिन कर्मी बिन जब्दी द्बीन जेरह पकडला गेला. १९ तेव्हां यहोशवा आखानाला म्हणाला. मज्या मुला, इस्राएलाच्या देव परमेश्वर ह्याला थोर मान; याच्यापुढें कबूल कर; तू काय केलें तें आतां मला सांग; माझ्यापासून कांही लपवूं नको. २० आखानांने यहोशवाला उत्तर दिलें की, मी खरोखर इस्रायलचा देव परमेश्वर ह्याच्याविरुध पाप केलें आहे; आणि मी जें केलें तें हें: २१ लुटीमध्यें एक चांगला शिणारी झगा, दोनशे शेकेल रूपें आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पाहा; माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत. रूपें खालीं आहे. २२ तेव्हा यहोशवानें जासूद पाठविले. ते डेऱ्याकडे धावत गेले, आणि पाहा, त्याच्या डेऱ्यांत त्या वस्तू लपविलेल्या होत्या व खाली रूपे होतें. २३ त्यांनीं त्या डेऱ्यांतून काढून यहोशवा आणि सर्व इस्रायल लोक ह्यांच्याकडे आणून परमेश्वरसमोर ठेवल्या. २४ त्यानंतर यहोशवानें व त्याच्याबरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनीं आखन बिन जेरह ह्याला व त्याच्याबरोबर ते रूपें, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे व त्याच्या मुली, त्याचे बैल, गाडावें, शेरडेंमेंढरें, त्याचा डेरा व त्याचें जें कांही होतेंनव्हतें तें सर्व आखोर खिडींत नेलें. २५ यहोशवा म्हणाला, तूं आम्हांला कां त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्रायलांनी त्याला द्ग्द्मार केला व तीं सर्व अग्नीनें जाळूनं वर दगड टाकले. २६ त्यांवर त्यांनी एक मोठी दगडांची रस केली; ती आजपर्यंत तेथें आहे. मग परमेश्वराच्या भडकलेला कोप शमला. ह्यावरून तला स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिद म्हणत आले आहेत.