५
१ गील्गल येथें वल्हांड़न सण पाळणें व सुंता इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वरानें तिचें पाणी त्यांच्यासाठी कसें आटविलें हें यार्देनेपलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्रकिनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हां इस्राएल लोकांच्या भीतीनें त्यांच्या काळजाचें पाणीपाणी झालें आणि त्यांच्यांत काही हिमत राहिली नाहीं. २ त्या समयी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर. ३ त्याप्रमाणें यहोशवानें गारगोटीच्या सुऱ्या बनवून गीबअथ हा-अरोलोथ 2 येथें इस्राएल लोकांची सुंता केली. ४ यहोशवानें त्यांची सुंता केली ह्याचें कारण हें की, युद्धास पात्र असे मिसर देशांतून निघालेले सगळे पुरुष मिसर देशांतून निघाल्यानंतर वाटेनें रानांत मरण पावले होते. ५ मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशांतून बाहेर निघाल्यानंतर रानांत वाटेनें जे जन्मले त्यांच्यी सुंता झाली नव्हती; ६ कारण इस्राएल लोक रागात चाळीस वर्षे प्रवास करीत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्रानें म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वरचें सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांच्या संहार झाला होता ; परमेश्वरानें त्यांना शपथेवर सांगितलें होतें की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊं केले आणि ज्यात दुधामधाचे प्रहार वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पंडू देणार नाहीं ७ त्यांच्या जागी त्यांची जी मुलें त्यानें वाढविली होती त्यांची यहोशवानें सुंता केली, कारण वाटेनें त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुन्तच राहिली होती. ८ सर्व राष्ट्राची सुंता करणें संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणींत आपापल्या ठिकाणी राहिले. ९ मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला. मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे. म्हणून आजहि त्या जागेला गीलगाल (लोटून देणें) १० इस्राएल लोकांनीं गील्गालांत तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानांत त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळीं वल्हांडण सण पाळला. ११ वल्हांडणाच्या दुसऱ्याच दिवशी त्या देशांत पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला. १२ त्यांनी देशांतलें उत्पन्न खाल्लें त्याच्या दुसर्या दिवसापासून मात्रा बंद झाला; तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातलें उत्पन्न खाल्लें. यहोशवा आणि तरवार उपसून उभा राहिलेला पुरुष १३ यहोशवानें यरीहोजवळ असतांना समोर पहिलें तों कोणी पुरुष आपल्या हातीं उपसलेली तरवार घेऊन पुढे उभा आहे असें त्याच्या नजरेस पडलें यहोशवानें जवळ जाऊन वीचारलें, तूं आमच्या पक्षाचा कीं आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? १४ तो म्हणाला, नाही; मी येथें परमेश्वराचा सेनापती ह्या नात्यानें आलों आहें. तेव्हां यहोशवानें त्याला दंडवत घालून म्हटलें, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे ? १५ परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पालांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तूं उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हां यहोशवानें तसें केले.