२
१ यरीहो येथें दोन हेर पाठविले जातात नूनाचा मुलगा यहोशवा ह्यानें गुप्तपणे दोन हेर शिट्टीं येथून पाठविले, त्यानें त्यांना सांगितलें की, जा आणि तो देश व विशेषतः यहीरो हेरून या. त्याप्रमाणें ते गेले आणि राहाब नांवाच्या वेश्येच्या घरी उतरले. २ मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, कांही इस्ञाएल लोंक देशाचा भेद काढण्यासाठी आज राञी येथें आले आहेत. ३ तेव्हा यरीहोच्या राजानें राहाबेला निरोप पाठविला की, जे पुरूष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरांत उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण सा-या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. ४ त्या दोघा पुरूषांना लपवून ती स्ञी म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरूष आले होते खरे, पण ते कोठले होते हें मला ठाऊक नाही. ५ अधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळीं ते निघून गेले, ते कोठे गेले तें मला ठाऊक नाही, तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल. ६ पण तिने तर त्या मानसाना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्या लपवून ठेवलें होतें. ७ त्यांचा मागावर निघालेले लोक यरर्देनेकडे जाणार्या वाटेने उतारापार्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. ८ इकडे ते हेर झोपी जाण्यापूर्वीती स्ञी त्यांच्याकडे धाब्यावर गेली, ९ आणि त्यांना म्हणाली, परमेश्वरानें हा देश तुम्हाला दिला आहे, आम्हाला तुमची दहशत बसली आहे, आणि देशांतील सर्व रहिवाशांची तुमच्या भींतीनें गाळण उडाली आहे, हें मला ठाऊक आहे, १० कारण तुम्ही मिसर देशीहून निघाला तेव्हा तूमच्यासमोर परमेश्वरानें तांबड्या समुद्राचें पाणी कसे आटविलें आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमो-यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्हीं कसा समूळ नाश केला हें आमच्या कानी आलें आहे. ११ हें ऐकताच आमच्या काळजाचें पाणीपाणी झालें आणि तुमच्या भींतीमुळें कोणाच्या जिवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. १२ मी तुमच्यावर द्या केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नांवाने शपथ घ्या की, आम्हीहि तुझ्या बापाच्या घराण्यावर द्या करू, आणि ह्याबद्दल मला खाञीलायक खूण द्या, १३ तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हां सर्वाचे प्राण वाचवू, अशीहि शपथ घ्या, १४ तेव्हा त्या पुरूषांनी तिला म्हटलें, तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचेप्राण देऊ, आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशीं द्याळूपणानें व खरेपणानें वागूं. १५ तेव्हां तिनें त्यांना खिडकींतून दोरानें खाली उतरविलें, कारण तिचें घर गांवकुसावरच ती राहत होती. १६ तिने त्यांना सांगितले होतें की, तुमचा पाठलाग करणा-यांनीं तुम्हाला गाठूं नये म्हणून तुम्ही डोंगरवटीकडे जा आणि तेथें तीन दिवस लपून राहा, तोंपर्यत तुमचा पाठलाग करणारे परततील, मग तुम्ही मार्गस्थ व्हा. १७ ते पुरूष तिला म्हणाले होते, तू आमच्याकडून जी शपथ वाहविली आहे तिच्याबाबतीत आम्हाला दोष न लागो, १८ माञ आम्ही ह्या देशांत येऊं तेव्हा ज्या खिडकींतून तूं आम्हाला उतरविलें, तिला हा किरमिजी दोर बांध आणि ह्या घरांत तुझे आईबाप, भाऊबंद आणि तुझ्या बापाचें सबंध घराणें तुझ्याजवळ एकञ कर. १९ कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्यांचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील. २० जर तू आमची कामगिरी बाहेर फोडलीस तर आमच्याकाडून जी शपथ तू वाहविली आहेस तिच्यातून आम्ही मुक्त होऊ. २१ ती म्हणाली, तुमच्या सांगण्याप्रमाणेच होईल. ह्याप्रमाणें त्यांना निरोप दिल्यावर ते मार्गस्थ झाले; नंतर तिनें किरमिजी दोर आपल्या खिडकीला बांधला. २२ ते जाऊन डोंगरवटीत पोहंचले, आणि त्यांच्या पाठलाग करणारे परतून जाईपर्यंत तेथे तीन दिवस राहिले; त्यांच्या पाठलाग करण्यार्यानी वाटेत चहुंकडे शोध केला, पण ते त्यांना सापडले नाहीत. २३ मग ते दोगे पुरुष डोंगरवटीतून उतरून नुनाचा मुलगा यहोशवा ह्याच्याकडे परत आले आणि घडलेंले सगळे वर्तमान त्यांनी त्याला सांगितले. २४ ते यहोशवाला म्हणाले, हा सर्व देश परमेश्वरानें आपल्या भीतीमुळें ह्या देशाच्या सर्व रहिवाश्यांची गाळण उडाली आहे