२०
१ तेव्हां सर्व इस्राएलाचीं संतानें निघालीं आणि दानापासून वैर शेब्यापर्यंत आणि गीलादाच्या प्रांतापर्यंत परमेश्र्वराजवळ भिजप्यांत त्यांची सभा एका मासासारिखी मिळाली. २ असें इस्राएलाच्या सर्व वंशांतले अवघे लोक यांतले पुढारी देवाच्या लोकांच्या सभेंत उभे राहिले; तरवार उपसणारे असे चार लाख पायदळ होते. ३ नंतर खण्यामीन संतानानी ऐकिलें कीं, “इस्राएलाचीं संतानें मिजप्यांत चढून गेलीं आहेत.” तर इस्राएलाचीं संतानें म्हणालीं, “आम्हास सांगा, ही दुष्टाई कसी झाली?” ४ तेव्हां तो लेवी माणूस म्हणजे जी मारिली होती तिच्या नवऱ्याने उत्तर देतां म्हटले, “ मी आपल्या उपपत्तीसुद्धां बन्यामी नाचा तो गिबा तेथें येऊन वस्तीत उतरलो. ५ नंतर गीब्यांतल्या माणसानी मजवर उठून रात्रीं मजसाठीं घराला वेढा घातला; त्यानी मला जीवें मारायास योजिलें आणि माझ्या उपपत्तीवर असा जुलूम केला कीं ती मेली. ६ नंतर मी आपली उपपत्ती घेऊन तिचे तुकडे केले, आणि ती इस्राएलाच्या सर्व देशाच्या प्रांतांत पाठविली, कारण कि त्यानी इस्राएलांत दुष्कर्म केली आहे. ७ पाहा, तुम्ही सर्व इस्राएलाचीं संतानें एथें आपलें सम्मत व बोध काढून द्दा.” ८ तेव्हां लोक एका मान्सासारीखा उठून बोलले, “ आमच्यांतला कोणी आपल्या घरास जाणार नाहीं, आणि कोणी आपल्या घराकडे फिरणार नाहीं; ९ परंतु आतां आम्ही गीब्याविषयीं जी गोष्ट करूं ती हीच; देवखूणेप्रमाणें त्यावर जाऊं. १० आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतल्या शंभरांतून दाहा, व हजारांतून शंभर, व आयुतांतून हजार, इतकीं माणसें लोकांसाठी शिधा आणायला घेऊं ; म्हणजे त्यानी जाऊन बन्यामीनाच्या गिब्याने इस्राएलांत जें मर्खपण केलें, त्या अवघ्याप्रमाणें त्यासीं करावें.” ११ मग इस्राएलांतलीं सर्व माणसें एका माणसासारिखी जोडलेलीं असतां त्या नगराजवळ मिळालीं. १२ तेव्हां इस्राएलाच्या वंशानी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसें पाठवून म्हटलें, “तुमच्यामध्यें जी दुष्ताई झाली, ती ही कसी? १३ तर आतां तुम्ही गिब्यांत जीं माणसें ते दुष्ट लोक काढून द्दा; म्हणजे आम्ही त्यांस जीवें मारून इस्राएलांत दुष्टाई नाहींसी करूं.” परंतु बन्यामीनानी आपले भाऊ इस्राएलाचीं संतानें यांची गोष्ट मान्य केली नाहीं. १४ आणि बन्यामीनाचीं संतानें इस्राएलाच्या संतानांसी लढायास जायाला आपल्या नगरांतून निघून गीब्याजवळ मिळालीं. १५ तेव्हां त्या दिवसीं बन्यामीनाच्या; संतानांची झडती नगरांतून घेतली गेली; ते सवीस हजार तरवारीने लढणारे पुरुष इतके होते; त्यांखेरीज गिब्यांत राहणारें यांची झडती घटली गेली; ते सातशें निवडलेले पुरुष होते. १६ त्या सर्व लोकांतले सातशें निवडलेले पुरुष असे डावरे होते; त्या प्रत्येकाने न चुकतांना गोफणीने गोटा केसाला देखील मारावा. १७ आणि बन्यामीन्यांखेरीज इस्राएली माणसांची झडती घेतली गेली, तेव्हां चार लाख तरवारीने लढणारे पुरुष; ते सर्व लढाऊ पुरुष होते. १८ मग इस्राएलाचीं संतानें उठून बेथएलास चढून आलीं, त्यानी देवाजवळ विचारितां म्हटलें, “बन्यामिनाच्या संतानांसी लढायला आमच्यांत पहिल्याने कोणी जावें?” तेव्हां परमेश्र्वराने सांगितलें, “याहुद्दाने पहिलें जावें.” १९ यास्तव इस्राएलाच्या संतानानी सकाळी उठून गिब्यावर तळ घरीला. २० मग इस्राएली माणसें बण्यामिण्यासीं लढायाला बाहेर गेलीं, आणि इस्राएली माणसनी त्यांसी लढाई गिब्याजवळ लाविली. २१ तेव्हां बंयामिनाच्या संतानानी गिब्यांतून निघून त्या दिवसीं इस्राएलांतल्या बावीस हजार पुरुषांस भूमीवर पाडून नाश केला. २२ तथापि लोक म्हणजे इस्राएलाचीं माणसें धीर धरून जेथें आपण पहिल्या दिवसीं लढाई लाविली होती, त्या ठिकाणीं फिरून करूं लागलीं. २३ (कारण कीं इस्राएलाची संतानें चढून जाऊन परमेश्र्वरापुढें सांजपर्यंत रडलीं होतीं, आणि त्यानी परमेश्र्वराजळ असें विचारिलें होतें कि, माझा भाऊ बन्यामान याच्या संतानांसीं लढायाला मी फिरून जाऊं कीं काय? तेव्हां परमेश्र्वराने सांगितलें “तूं त्यांवर चढून जा.”) २४ यास्तव दुसऱ्या दिवसीं इस्राएलाचीं संतानें बण्यामिण्याच्या संतानावर गेलीं. २५ तेव्हां दुसऱ्या दिवसीं यांसीं भिडायाला बण्यामिनी गीब्यांतून निघाले, आणि त्यानी इस्राएलाच्या संतानांतल्या अनिक अठरा हजार पुरुषांस भूमीवर पाडून नाश केला; हे सर्व तरवारीने लढणारे होते. २६ नंतर सर्व इस्राएलाचीं संतानें म्हणजे सर्व लोक देवाच्या मंदिराजवळ चढून येऊन रडले, आणि त्यानी तेथें परमेश्र्वरापुढें राहून त्या दिवसीं सांजपयंत उपास केला, आणि परमेश्र्वरापुढ होमे व शांतिकारक यज्ञ केले. २७ आणि इस्राएलाच्या संतानानी परमेश्र्वराजवळ विचारिलें, कां कीं त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथें होता. २८ आणि आहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्य दिवसांत त्याच्यापुढें उभा राहत होता; त्यानी असें म्हटलें कीं, “काय, मी आपला भाऊ बण्यामीन याच्या संतानांनी लढायाला फिरून जाऊं किवा राहूं?” तेव्हां परमेश्र्वराने सांगितलें, “तुम्ही चढून जा; कां कीं उद्यां मी त्यांस तुझ्या हाती देईन.” २९ मग इस्राएलानी गिब्याच्या चहूकडें दबाधारी ठेविले. ३० मग तिसऱ्या दिवसीं इस्राएलांची संताने खन्यामिण्याच्या संतानांवर चढून गेलीं आणि पूर्वीप्रमाणें त्यानी गिब्याजवळ मांडणूक केली. ३१ तेव्हां बन्यामिण्याचीं संतानें लोकांसिं भिडायला निघून नगरापासून कांहीसीं दूर गेलीं ; आणि पूर्वी प्रमाणें कित्येक लोकांस हाणून पांडू लागलीं; त्या सडकांतली एक देवाच्या मंदिराकडे आणि दुसरी गिब्याकडे चढून आती, त्याजवळ शेतांत इस्राएलातला लोकांस सुमारें तीस पुरुष त्यांनी पडिले; ३२ यास्तव खण्यामिण्याच्या संतानानी म्हटलें “पहिल्यासारिखे ते आमच्यापुढें मारले जातात;” परंतु इस्राएलातला संतानानी म्हटलें “आम्ही पळून नगरांतून सडकांवर आडून.” ३३ नंतर इस्राएलाच्या सर्व माणसांनी आपलें ठिकाण सोडून बालतामारांत मांडणूक केली; इस्राएलाचे द्बाधारीही आपल्या ठिकाणांतून म्हणजे गिब्याजवळच्या माळांतून उठले. ३४ असे सर्व इस्राएलांतले एलान्तले निवडलेले दाहा हजार पुरुष गिब्यापुढें आले, आणि लढाई भारी झाली, तथापि ते समजले नव्हते कीं आपल्यास अनर्थ लागूं झाला आहे. ३५ तेव्हां परमेश्र्वरानें बण्यामिनाला इस्राएलापुढें मारिलें; असें इस्राएलाच्या संतानानी त्या दिवसीं बण्यामिन्यांच्या पंचवीस हजार आणि शंभर पुरुषांचा नाश केला; ते सर्व तरवारीने लढणारे होते. ३६ बण्यामिण्याच्या संतानांनी तर पहिलें कीं आपण मारले गेलों; हें असें झालें कीं इस्राएली मनुष्यानी गिब्यावर जे दबाधारी ठेविले होते, त्यांचा भरवसा धरिला म्हणून ती पळून बण्यामिनी माणसांस ठिकाण दिल्हें. ३७ तेव्हां दबाधार्यांनी ठ्तावली करून गिब्यावर घाला घातला आणि त्यानी धावत जाऊन त्या सर्व नगरला तरवारीने मारिलें. ३८ तेव्हां दबघारयासंगती इस्राएली माणसांचा संकेत होता कीं त्यांनी नगरांतून उंच धूर चढवावा. ३९ नंतर इस्राएली माणसानी लढाईत तोंड फिरविलें; तेव्हां बण्यामिनी इस्राएली माणसांतले सुमारे तीस पुरुष यांस हाणून पडूं लागले, कां तर त्यांनी म्हटलें कीं, “निश्चये पाहिल्या लढाईसारिखे ते आमच्यापुढे मारलच जातात.” ४० नंतर नगरांतून घुराचा लोट उंच चढूं लागला, तेव्हा बण्यामिनानी आपल्या पाठीमागें दृष्टी लाविली, तर पाहा, संपूर्ण नगराचा जाळ आकाशांत चढला. ४१ तेव्हां इस्राएली माणसें फिरलीं, आणि खन्यामिनी माणसांची घालमेल झाली; कारण कीं त्यानी पहिलें कीं आपल्यास अनर्थ लागूं झाला आहे. ४२ यास्तव ते फिरून इस्राएलाच्या माणसांपुढून रानाच्या वाटेने पळाले; तथापि लढाई ध्यासीं लगाटली, आणि जे दुसऱ्या नगरन्तले त्यानीही आपल्याम्ध्यें त्यांचा नाश केला. ४३ हे तर बण्यामिनांस वेढून त्यांच्या पाठीस लागले, आणि यानी गिब्यास्मोर पूर्वेकडे त्यांस अनायासेकरून तुडविलें. ४४ असीं बण्यामिनान्तलीं अठरा हजार माणसे पडलीं; ते सर्व शूर पुरुष होते. ४५ आणि दुसरे फिरून रानांत रीम्मोन खडकावर पळून गेले; तथापि त्यानी त्यांतले पांच हजार पुरुष सडकांवर वेंचून घेतले, आणि गीडोमापर्यंत त्यांच्या पाटीसीं लगटून त्यांतले दोन हजार पुरुष मारिले. ४६ असे त्या दिवसीं बन्यामिनांतले जे पडले, ते सर्व तरवारीचे लढणारे पंचवीस हजार पुरुष होते; ती सर्व शूर माणसें होतीं. ४७ परंतु साहाशें पुरुष फिरून रानांत रिम्मोन खडकावर पळून गेल, आणि ते रिम्मोन खडकावर चार मिहीने राहिले. ४८ नंतर इस्त्राएली माणसानी मागें फिरून बन्यामीण्याच्या संतानाव्र जाऊन नगरातलीं माणसे व पशुही जितके सापडले, तीतक्यांस तरवारीने जिवें मारिलें, अणखी जीं नगरें आढळलीं त्य सर्वांस आग लाविली.