१८
१ त्या दिवसांत इस्राएलावर कोणी राजा नव्हता, आणि त्या दिवसांत दानाचा वंश वस्ती करायासाठीं आपलें वतन मिळवायाला पाहत होता; कां कीं त्या दिवसापर्यंत त्यांस इस्राएलाच्या वंशांमध्यें वतनांतलां भाग मिळाला नव्हता. २ यास्तव दानाच्या संतानानी आपल्या सिमांतून, म्हणजे जरा व एष्टावोल यांतून, आपल्या कुळातलीं शूर माणसे असे पांच परुष प्रांत हेरायास व त्याचा शोध करायास पाठविले; तेव्हां त्यानी त्यांस सांगितलें, “तुझी जाऊन तो प्रांत शोधा.' मग ते एफ्राइमाच्या डोंगरावर मीखाच्या घरापर्यंत जाऊन तेथें उतरले. ३ ते मिखाच्या घराजवळ होते, तेव्हां त्यानी त्या तरुण लेव्याचा शब्द ओळखिला; यास्तव ते तिकडे वळून त्याला बोलले, “ तुला इकडे कोणी आणिलें? आणि तूं एथें काय करितोस? आणि तुझें एथें काय आहे?” ४ तेव्हां त्याने त्यांस सांगितलें, “मिखाने मला असें केलें, आणि मला मोलाने ठेविलें; यास्तव मी त्याचा याजक झालों आहे.” ५ तेव्हां त्यानी त्याला सांगितले, “तूं कृपेने देवाजवळ विचार, आणि आम्ही ज्या मार्गावर चाललों तो सफळ होईल किंवा नाहीं, हें आम्हास कळावें.” ६ तेव्हां तो याजक त्यांस बोलला, “तुम्ही सुखरूप जा; तुम्ही आपल्या ज्या मार्गाने चालतां, त्यावर परमेश्र्वरचें लक्ष आहे.” ७ मग तीं पांच माणसें चालून लाईशास गेलीं, आणि त्यानी पाहिलें कीं लोक त्यांत निर्भय जीदोन्यांच्या रितीप्रमाणें स्वस्थ व निर्भय राहिले आहेत; आणि देशांत कशाविषयींही उपद्रव करणारा किंवा निवारण करणाराअसा कोणी दणी नाही; आणखी ते जीदोन्यांपासून दूर होते, आणि मनुष्याजवळ त्यांचें कार्य नव्हतें. ८ नंतर ते जरा व एष्टावोल तेथें आपल्या भावांजवळ आले; तेव्हा त्यांच्या भावानी त्यांस म्हटलें, “तुझी काय म्हणतां?” ९ मग ते बोलले, “तुझी उठा, म्हणजे आपण त्यांवर जाऊं: कां कीं आम्ही तो देश पाहिला, आणि तो फार चांगला आहे, आणि तुम्ही उगेच राहतां काय? तुम्ही तो प्रांत वतन करून घेण्यासाठीं निघून जायाला आळस करू नका. १० तुम्ही गेलां असतां, स्वस्थ लोकांकडे व पसरट प्रांताकडे पोहंचाल; कां कीं येथें पृथ्वींतळी कोणतीही वस्तु उणी नाहीं, असें ठिकाण देवाने तुमच्या हाती दिल्हें आहे.” ११ मग तेथून, म्हणजे जरा व एष्टावोल यांतून दानाच्या कुळांतले साहाशें पुरुष लढाईसाठी हल्या रबंद होऊन निघाले. १२ तेव्हां त्यानी जाऊन यहुद्दांतल्या किर्या थयारीम जवळ तळ धरिला; यास्तव आजपर्यंत त्या ठिकाणाला माह्ने दान असें म्हणत आले; पाहा, तें किर्याथयारीमाजवळ आहे. १३ मग ते तेथून पुढ एफ्राइमाच्या डोंगरावर जाऊन मिखाच्या घरापर्यंत पोहंचले. १४ तेव्हां जीं पांच माणसें लाइश प्रांत हे रायास गेलीं होतीं, त्यानी आपल्या भावांस असें म्हटलें कीं, “या घरामध्यें याजकाचें एफोद व कुळदेव, आणि कोरींव व ओतींव मूर्त्ति आहे; हें तुम्हास कळलें कीं काय? तर आतां काय कराल तें समजा.” १५ मग त्यांनी तिकडे वळून मी खाच्या घरीं त्य तरुण लेव्याच्या घरांत जाऊन त्याजवळ कुशलप्रश्न केले. १६ नंतर जीं दानाच्या लोकांतली साहाशें माणसें तीं आपल्या लढाईचीं शेस्त्रें अवळून दरवाज्यापुढें उभी राहिलीं. १७ आणि जीं पंच माणसें मांत हेरायला गेलीं होतीं, तीं चढून आंत शिरलीं, आणि त्यानी ती कोरींव मूर्त्ति घेतली; तेव्हां तो याजक व लढायाचीं हत्यारें बांधलेलीं जीं साहाशें माणसें, तीं दरवाज्यापुढें उभीं राहिलीं. १८ तर त्यानी मिखाच्या घरांत जाऊन ती कोरींव मूर्त्ति व तेएफोद व ते कुळदेव व ती ओतींव मूर्त्ति घेतली असतां, तो याबक त्यांस बोलला, “तुम्ही काय करिता?” १९ तेव्हां त्यानी त्याला सांगितलें, “तूं उगाच राहा; आपला हात आपल्या तोंडावर लावून आमच्यासंगतीं चाल, आणि आमचा बाप व आमचा याजक व्हावें, किंवा वंशाचा म्हणजे इस्राएलांतल्या कुळाचा याजक व्हावें, कोणतें बरें?” २० तेव्हां त्या याजकाच्या मनास बंरे वाटलें; यास्तव तो तें एफोद व ते कुळदेव व ती कोरींव मूर्त्ति घेऊन त्या लोकांमध्यें गेला. २१ मग ते मुरडून चालले, तेव्हां त्यानी लेंकरें व गुरें व खटलें आपल्यापुढें लाविलें. २२ ते मिखाच्या घरापासून कांहींसें दूर गेल्यावर जीं घरें मिखाच्या घराजवळ होतीं, त्यातलीं माणसे बोलावलेलीं असतां, दानाच्या लोकांच्या पाठीस लागलीं. २३ आणि त्यानी दानाच्या लोकांस हक मारिली; तेव्हां ते आपलीं तोंडे मुरडून मिखला म्हणाले, “तुला काय झालें? म्हणून तूं समुदाय मिळवून आलास” २४ तेव्हां तो बोलला, “जे देव म्या केले होते, ते आणि तो याजक तुम्ही घेऊन गेलां आहां, आणि मला दुसरें काय आहें? तर तुला काय झालें हे तुम्ही मला कसें म्हणतां? २५ मग दानाच्या लोकानी त्याला म्हटलें, “ तू आपल्या शब्द आम्हास ऐकूं देऊं नको; नाहीं तर कडवट जिवाची माणसें तुम्हासीं भिडतील, आणि तूं आपला जीव व आपल्या घराण्याचा जीव गगमावसील.” २६ मग दानाचे लोक आपल्या मार्गाने चालले, आणि मीखाने पहिलें कीं आपल्यापेक्षां ते बळकट आहेत, यास्तव तो माघारा आपल्या घरास फिरला. २७ असें मीखाने ज्या मूर्त्ति केल्या होल्या त्यांस आणि त्याचा जो याजक होता, त्याला त्यानी घेतलें; मग लाइश्यावर, म्हणजे स्वस्थ व निर्भय लोकांवर जाऊन त्यांस तरवारीने मारिलें, आणि नगरला आग लाऊन जाळिलें. २८ तेव्हां कोणी सोडविणारा नव्हता, कां तर तें जीदोनापासून दूर होतें, आणि मनुष्याजवळ त्यांचें कांहीं कार्य नव्हतें; नंतर दोनी तें नगर बांधून त्यांत राहिले. २९ आणि आपला पूर्वज दान, जो इस्राएलापासून जन्मला. त्याचें नांक दान त्या नगरला ठेविलें, परंतु पहिल्याने त्या नगराचें नावं लाइश होतें. ३० नंतर दावाच्या लोकानी आपल्यासाठीं ती कोरींव मूर्त्ति मांडिली; आणि मनाश्श्याच्या पुत्र गेशोंम याचा वंशस्थ यहोनाथान व याचीं संतानें, देश जिंकून नेण्याचा दिवसापर्यंत दानाच्या वंशाचे याजक होतीं. ३१ आणि देवाचें मंदिर शिलोमध्यें होतें, त्य सर्व दिवसांत त्यानी आपल्यासाठीं मिखाची कोरींव मूर्त्ति जी त्याने केली होती ती राखिली.