१५
१ मग कांहीं वेळानंतर गहूं कापण्याच्या दिवसांत शाम्शोन एक करडूं घेऊन आपल्या स्त्रीच्या भेटीस गेला; तेव्हां शामेशोनाने म्हटलें, “मी खोलींत आपल्या बायकोजवळ जाईन;” परंतु तिच्या बापाने त्याला जांऊ दिल्हें नाहीं. २ तिचा बाप बोलला, “त्या निश्र्वयें म्हटलें कीं त्या तिचा अगदी द्देष केला, म्हणून म्या ती तुझ्या सवंगड्याला दिल्ही; तिची धाकटी बहीण तिजपेक्षां सुंदर नाहीं कीं काय? आतां ही तिच्या ठिकाणीं तुला होवो.” ३ तेव्हां शामशोन त्याविषयीं बोलला, “या वेळेस जरी मी पलीष्ट्यांसी वाईट करितों, तरी त्यापेक्षा निर्दोषी होईल.” ४ मग शमशोनाने जाऊन तिनशें कोल्हे धरिले, आणि कोलितें घेऊन शेपुटांकडे शेपूट फिरवून दोन दोन शेपटांमध्यें एकएक कोलीत ठेविलें. ५ मग कोलितांस विस्तू लावून त्याने त्यांस पालिष्ट्यांच्या उभ्या पिकांत सोडिले, आणि उभ्या पिकसुद्धा सुड्या व बेतुनाचे मुले जाळिले. ६ तेव्हां पलिष्टी बोलले, “हें कोणी केलें?” नंतर त्यानी म्हटलें, “तिम्नाथकराचा जावायी शाम्शोन याने केलें, कां तर त्याने त्याची स्त्री घेऊन याच्या संवगद्याला दिल्ही.” मग पलिष्ट्यानी बाउन तिला व तिच्या बापाला आग लावून जाळिलें. ७ नंतर शाम्शोनाने त्यांस म्हटले, “जरी तुम्ही एवढें केलें, तरी मी तुमचा सूड घेईन, आणि मग स्वस्थ होईन.” ८ तेव्हां त्याने त्यांस मांडीवर व कटीवर मोठ्या मारणे मारिलें, नंतर तो खालीं जाऊन एटाम खडकाच्या दऱ्यांत राहिला. ९ मग पलिष्ट्यानी चढून जाऊन यहुद्दांत तळ धरिला, आणि ते लेहींत पसरले. १० तेव्हां यहुदी माणसें बोललीं, “तुम्ही आम्ह्यावर कां चढून आलां?” तेव्हां ते बोलले, “शाम्शोनाला बंद करावें म्हणून; असें त्याने आह्यासीं केलें, तसें त्यासीं करायला आम्ही चदून आलों आहों.” ११ नंतर यहुद्दांतलीं तीन हजार माणसें खालीं एटाम खडकाच्या दऱ्याजवळ जाऊन शाम्शोनाला बोललीं, “पलिष्टी आम्हावर अधिकार करितात, हें तुला कळलें नाहीं काय? तर त्वां आम्हास हें काय केलें?” तेव्हां तो त्यांस बोलला, “जसें त्यानी माझें केले, तसें म्या त्यांचें केलें आहे.” १२ नंतर त्यानी त्याला म्हटलें, “तुला पलिष्ट्यांच्या हातीं द्दायासाठीं आम्ही तुला बांधायास खालीं आलों आहों.” तेव्हां शाम्शोन त्यांस बोलला, “तुम्ही स्वतां मजसीं भिडणार नाहीं, म्हणून माझ्याजवळ शपथ वाहा.” १३ मग त्यानी त्याला असे सांगितलें कीं, “नाहीं, परंतु आम्ही तुला षट बांधूं. आणि तुला त्यांच्या हातीं देऊं; तुझा जीव तर घेणारच नाहीं.” तेव्हां त्यानी नव्या दोन दोरांनी त्याला बांधून खडकातून वर नेलें. १४ तो ळेहीस पोहंचला, तेव्हां पलिष्ट्यानी त्याला भेटून गर्जना केली; परंतु परमेश्वराच्या आत्म्याने त्याला प्रेरिलें असतां जसे वाखातुंत अमींत जळून जातात, तसे त्याच्या बाहुंवरले दोर झाले; म्हणजे तीं बंधनें त्याच्या हातांतून गळून गेलीं. १५ नंतर त्याला गाढवाचें ओलें चाभाड अढळलें, तेव्हां त्याने आपला हात लावून ते घेतलें, आणि तेणेकरून हजार माणसें मारिलीं. १६ मग शाम्शोनाने म्हटलें, “रासभाच्या चाभादाने रासिंच्या रासी, म्हणजे रासमाच्या चाभाडाने म्या हजार माणसें मारिलीं. १७ तर त्याने बोलणें संपविल्यावर असें झालें कीं त्याने आपल्या हातांतून तें चाभड टाकिलें, यावरून त्या ठिकाणाचें नाव रामाथलेही ठेविलें. १८ तेव्हां त्याला ताहान फार लागली; यास्तव त्याने परमेश्वराला हक मारीत म्हटलें, “त्वां आपल्या चाकराच्या हाताने हे मोठें तारण दिल्हें, आहे; तर आतां म्या ताहानेने मरून असुंतांच्या हातीं पडावें कीं काय? १९ नंतर देवाने लेहीनतला खळगा फोडिला, आणि त्यातून पाणी निघालें; मग तो प्याला, यास्तव त्याचा प्राण माघार आल्याने तो जगला; यावरून त्या झऱ्याचें नांव एनहाक्कार म्हटलें गेलें; तो आजपर्यंत लेहीमध्यें आहे. २० त्याने तर पलिष्ट्याच्या दिवसांत इस्त्राएलाचा न्याय वीस वर्षे केला.