१३
१ तेव्हां इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराच्या दृष्टींत फिरून वाईट केलें, यास्तव परमेश्वराने ती पलिष्ट्यांच्या हातीं चाळीस वर्षे दिल्हीं. २ तेव्हां जरायांतला दानांच्या कुळाचा कोणीं माणुस होता; त्याचें नांव तर मानोहा, आणि त्याची स्त्री वांझ होती, यास्तव तिला लेंकरू झालें नव्हतें. ३ तेव्हां परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिल्हें, आणि तिला म्हटलें, “पाहा, आतां तूं वांझ, म्हणून तुला लेंकरूं झालें नाहीं, परंतू तूं गरोदर होऊन पुत्र प्रसवसील. ४ तर आतां तूं अगत्य असें संभाळ कीं द्राक्षारस व दारू पिऊं नको, आणि कांहीं अशुध्द खाऊं नको. ५ कां तर पाहा, तूं गरोदर होसील, आणि तूं पुत्र प्रसवसीलं आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा न फिरावा, कारण कीं तो मूल पोटीं झाल्यापासून देवाचा नेजेरी पुरूष होईल. आणि तो इस्त्राएलाला पलिष्टयांच्या हातांतून सोडवायास लागेल.” ६ तेव्हां त्या स्त्रीने जाऊन आपल्या नव-याला असें सांगितलें कीं, “देवाचा माणूस माझ्याजवळ आला, आणि त्याचें स्वरूप देवाच्या दूताच्या स्वरूपासारिखें फार भयंकर होतें; यास्तव तो कोठला. हें म्या त्याजवळ विचारिलें नाहीं, आणि त्याने आपलें नांव मला सांगितलें नाहीं. ७ परंतु तो मला बोलला, 'पाहा, तूं गरोदर होसील, आणि तूं पुत्र प्रसंवसील; तर आतां तूं द्रांक्षारस व दारू पिऊं नको, आणि कांही अशुध्द खाऊं नको; कां तर तो मूल पोटीं झाल्यापासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नेजेरी पुरूष होईल.'' ८ तेव्हां मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करीत म्हटलें, ''हे माझ्या प्रभू, माझें ऐक, जो देवाचा माणूस त्वां पाठविला होता, त्याने अगत्य आमच्याजवळ फिरून यावें, आणि जो मूल जन्मेल, त्यासाठीं आम्ही कसें करावें, हें आम्हास शिकवावें.'' ९ तेव्हां देवाने मानोहाचा शब्द ऐकिला, यास्तव देवाचा दूत त्या स्त्रियेजवळ फिरून आला; परंतु ती शेतांत बसली असतां तिचा नवरा मानोहा तिच्यासंगतीं नव्हता. १० तेव्हा ती स्त्री आपल्या नव-याला कळवायास उतावळी करून धावली, आणि तिने त्याला सांगितलें, ''पाहा, जो पुरूष त्या दिवसीं माझ्याजवळ आला होता, तो माझ्या दृष्टीस पडला आहे.'' ११ मग मानोहा उठून आपल्या स्त्रिच्यामागें चालून त्या पुरूषाजवळ गेला, आणि त्याला बोलला, “जो पुरुष या स्त्रीला बोलला होता, तो तूंच कीं काय?” तेव्हां तो बोलला, “मीच.” १२ मग प्रानोहा बोलला, “आतां तुझें बोलणें प्रत्ययास येवो; त्या मुलाची रीति व त्याविषयीं कर्म कसें व्हावें?'' १३ तेव्हां परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटलें, ''जें म्या या स्त्रीला सांगितलें, त्या अवघ्याविषयीं हिने संभाळावें. १४ द्राक्षारसाच्या वेलापासून जें उत्पन्न होतें, त्यांतलें काहीं हिने खाऊं नये, आणि द्राक्षारस व दारू पिऊं नये, आणि कांहीं अशुध्द खांऊ नये; जें सर्व म्या आज्ञेकरून तिला सांगितलें तें तिने पाळावें.'' १५ तेव्हां मानोहा परमेश्वराच्या दूताला बोलला, ''आम्ही तुला खोळंबा करून शेरडांतलें करडूं सिध्द करून तुझ्यापुढें ठेवावें, असें मागतों.'' १६ परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, ''जरी त्वां मला खोळंबा केला, तरी मी तुझें अन्न खाणार नाहीं; आणि तर तूं होम करसील, तर तो तुला परमेश्वराजवळ करावा लागेल.'' तेव्हां तो परमेश्वराचा दूत, हें मानोहाला कळलें नव्हतें. १७ मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटलें, ''तुझें नांव काय? कां कीं तुझें बोलणें प्रत्ययास आल्यावर आम्ही तुला मान देऊं.'' १८ तेव्हां परमेश्वराचा दूत त्याला बोलला, ''तूं माझें नांव कशासाठीं विचारितोस? तें तर अपूर्व आहे.'' १९ मग मानोहाने शेंरडांतले करडूं नैवेद्दासुध्दा घेऊन खडकावर परमेश्वराजवळ होम केला; तेव्हां मानोहा व त्याची स्त्री पाहत असतां, त्याने अपूर्व केलें. २० म्हणजे असें झालें कीं जेव्हां जाळ वेदीवरून आकाशांत चढला, तेव्हां परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या जाळांत चढला, आणि मानोहा व त्याची स्त्री यानी पाहून आपलीं तोंडें भूमीस लावून नमस्कार केला. २१ मग परमेश्वराचा दूत मानोहाच्या व त्याच्या स्त्रीच्या दृष्टीस फिरून पडला नाहीं; तेव्हां मानोहाला कळलें कीं तो परमेश्वराचा दूत होता. २२ मग मानोहा आपल्या स्त्रीला बोलला, ''आम्ही खचीत मरूं, कां तर आपण देव पाहिला आहे.'' २३ तेव्हां त्याची स्त्री त्याला बोलली, ''जर परमेश्वराने आम्हास जिवें मारायास इच्छिलें असतें, तर त्याने आमच्या हातांतून होम व नैवेद्द घेतला नसता, आणि हीं अवधीं आम्हास दाखविलीं नसतीं, आणि या वेळेच्या सारिखें वर्त्तमान आम्हास कळविलें नसतें.'' २४ नंतर त्या स्त्रीला पुत्र झाला, आणि तिने त्याचें नांव शामशोन ठेविलें; तो मूल तर वाढला, आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिल्हा. २५ तेव्हां जरा व एष्टावोल यांच्या मध्यभागीं दानाच्या छावणींत त्याला परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करूं लागला.