८
१ तेव्हां एफ्राइमी माणसें गिदोनास बोललीं, ''त्या आम्हाविषयीं असीं गोष्ट कां केली कीं आम्हास बोलावल्यावांचून तूं मिद्दान्यांसीं लढायास गेलास?'' असीं तीं त्यासीं बळें भांडलीं. २ तेव्हां तो त्यांस बोलला, ''म्या आतां तुमच्यासारिखें काय केलें आहें? अबियेजराच्या द्राक्ष खुडण्यापेंक्षा एफ्राइमाच्या द्राक्षवेचण्या ख-या झाल्या नाहींत कीं काय? ३ मिद्दानाचे अधिकारी ओरेब व ज्येब यांस देवाने तुमच्यासारिखें काय करवलें?'' तेव्हां तो असी गोष्ट बोलन्यावर त्यांचा त्यावरला कोप नाहींसा झाला. ४ गिदोन व त्याच्यासंगतीं जीं तीनशें माणसें तीं तर थकलेलीं असतांहि पाठीस लागतां यार्देंनेस जाऊन पार गेलीं. ५ तेव्हां तो सुक्कोथांतल्या माणसांस बोलला, ''माझे अनुसारी जे लोक त्यांस तुम्ही कृपेकरून भाकरोच्या चांदक्या द्दा; कां तर ते थकलेले आहेत, आणि मिद्दानाचे राजे जेबाह व जालमुन्ना यांच्या पाठीस मी लागलों आहें.'' ६ तेव्हां सुक्कोथाचे अधिकारी बोलले, ''काय, जेबाह व जालमुन्ना यांचे हात आतां तुझ्या हातीं आहेत कीं आम्ही तुझ्या सैन्याला अन्न द्दावें कीं काय?'' ७ तेव्हां गिहोन बोलला, ''यामुळें परमेश्वर जेबाह व जालमुन्ना हे माझ्या हातीं देईल तेव्हां तो रानांतल्या कांट्यानी व वीजरंगी झुडपानी तुमचीं अंगे झोडीन.'' ८ नंतर तो तेथून पनवेलास काढून जाऊन तेथल्यांसहि तसें बोलला, परंतु जसें सुक्कोथांतल्या साणसानी उत्तर दिल्हें होतें, तसेच नुवेलांतल्या माणसानी त्याला उत्तर दिल्हें. ९ तेंव्हां तो पनुवेलांतल्या माणसांसहि असें बोलला, ''जेव्हां मी सुखरूप माघारा येईन, तेव्हां बुरूज फोडून टाकीन.'' १० तेव्हां जेबाह व जालमुन्ना कार्कोरांत जाते, त्यांचे तळहि त्यांच्यासंगतीं होते; पूर्वेकडल्या जांच्या अवघ्या सैन्यांतले जे उरलेले ते सर्व मारांने पंधरा हजार होते; कारण कीं जे तरवारीने लढणारे एक लाख वीस हजार पुरूष पडलेले होते. ११ तेव्हा गिदोन राहोटयांत राहणा-यांच्या वाटेने नोबाह व यगूबहा यांच्या पूर्वेस चढून गेला; आणि त्याने तळ मारिला, कां कीं तो तळ निर्भय होता. १२ जेबाह व जालमुन्ना हे तर पळाले, परंतु तो त्यांच्या पाठीस लागला, आणि त्याने मिद्दानाचे ते दोन राजे जेबाह व जालमूना धरिले, आणि सर्व तळ भडकता केला. १३ मग योवाशाचा पुत्र गिदोन सूर्य ठगवल्यापूर्वी लढाईपासून माघारा आला. १४ तेव्हां त्यानें सुक्कोथांतला एक तरणा माणुस धरिला, आणि त्याजवळ मागितलें असतां त्यानी याजवळ सुक्कोयाचे अधिकारी आणि त्यांतले वडील असीं सत्याहत्तर माणसें लिहून दिल्हीं. १५ मग तो सुक्कोथांतल्या माणसांजवळ जाऊन बोलला, ''जेबाह व जालमुन्ना हे तुम्ही पाहा; यांविषयीं तुम्ही माझा अपमान करीत बोलला, 'काय, जेबाह व जालमुन्ना यांचे हात आतां तुझ्या हातांत आहेत कीं आम्ही तुझ्या थकलेल्या माणसांस अन्न द्दावें कीं काय?'' १६ नंतर त्याने त्या नगरचे वडील धरिलें, आणि रानांतल्या कांटया व वीजरंगी झुडपें घेतलीं, आणि तिहींकडून सुक्कोथांतल्या माणसांस शिक्षा केलीं १७ आणि त्याने पनुवेलाचा बुरूज फोडून टाकिला, त्या नगरांतलीं माणसेंहि मारिलीं. १८ मग जेबाह व जालमुन्ना यांस तो बोलला, ''जीं माणसें तुम्ही थाबोरांत मारिलीं तीं कसीं?'' तेव्हां ते बोलले, ''जसा तूं तसींच तीं; त्यांतला प्रत्येक राजपुत्रांच्या स्वरूपाने होता.'' १९ तेव्हां हा बोलला, ''ते माझे भाऊ, माझ्या आईचीं लेंकरे; जर तुम्ही त्यांस वांचविलें असतें, तर परमेश्वराच्या जितेपणावरून म्या तुम्हास मारिलें नसतें.'' २० तेव्हां त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितलें, ''तूं उठून त्यांस मार.'' परंतु त्या कुमाराने आपली तरवार काढिली नाहीं; कां तर तोंपर्यंत तो तरूण होता, यास्तव तो भ्याला. २१ तेव्हा जेबाह व जालमुन्ना बोलला, 'तूं उठून आम्हास मार, कां तर जसा पुरूष, तसा त्याचा पराक्रम आहे.'' यास्तव गिदोनाने उठून जेबाह व जालमुन्ना यांस मारिलें, आणि त्यांच्या उंटाच्या गळ्यांमध्यें ज्या चंद्रकोंरा होत्या, त्या घेतल्या. २२ तेंव्हां इस्त्राएलांतल्या माणसाली गिदोनाला सांगितलां, ''त्यां अणखी तुझ्या पुत्राने आणि तुझ्या नाताने आम्हावर मिद्दानाच्या हातांतून तारिलें आहे.'' २३ तेव्हां गिदोव त्यांस बोलला, ''मी तुम्हावर अधिकार करणार नाहीं, माझा पुत्रहि तुम्हावर अधिकार करावा.'' २४ तरी गिदोन त्यांस बोलला, ''मी तुमच्याजवळ एक मागणें करींन कीं तुम्ही एकएकाने आपापल्या लुटींतलीं कुंडलें मला द्दावीं.'' त्यांस तर सोन्याचीं कुंडलें होतीं, का तर ते इशमएली होते. २५ तेव्हां ते बोलले, ''आम्ही देतोंच देतों.'' मग त्यानी वस्त्र पसरिलें, आणि त्यांतल्या एकएकाने आपापल्या लुटीचीं कुंडलें त्यावर टाकीलीं. २६ आणि जीं सोन्याचीं कुंडलें त्याने मागितलीं त्यांचें सोनें एक हजार सातशें शेकेल वजन होतें; चंद्रकोरा व बिंदुरूप अळंकार व मिद्दानी राजांचीं जांबळीं वस्त्रें याखेरीज, आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतले हार यांखेरीज तें होतें. २७ तेव्हां गिदोनाने तेणेकरून याजकाचें एफोद केलें, आणि आपलें नगर अफ्रा यांत तें ठेविलें, मग सर्व इस्त्राएलानी तेथें त्यामागें लागून व्यभिचार केला; असें तें गिदोनाला व त्याच्या घराण्याला फांसरूप झालें. २८ मिद्दानाचा तर इस्त्राएलाच्या संतानांपुढें मोड झाला, आणि त्यानी आपलें डोकें अणखी वर केलें नाहीं; असें गिदोनाच्या दिवसांत देश चाळीस वर्षे स्वस्थ राहिला. २९ योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरीं जाऊन राहिला. ३० आणि गिदोनाचें औरस संतान असे त्याला सत्तर पुत्र झाले; कां तर त्याला स्त्रिया बहुत होत्या. ३१ आणि शखेमांत जी त्याची उपपत्नी ती त्यापासून पुत्र प्रसवली, आणि त्याने त्याचें नांव अबीमेलेख ठेविलें. ३२ मग योवाशाचा पुत्र गिदोन चांगल्या म्हातारपणीं मेला, आणि अबीएज-यांच्या अफ-यांस आपला बाप योवाश याच्या कबरेंत पुरला गेला. ३३ तेव्हां असें झालें कीं गिदोन मेल्यावर इस्त्राएलाच्या संतानानी फिरून स्वामी देवांच्यामागें लागून व्यभिचार केला, आणि खरीथस्वामी आपला देव असा करून ठेविला. ३४ असें इस्त्राएलाच्या संतानानी आपला देव परमेश्वर, ज्याने त्यांस त्यांच्या चहुंकडल्यल सर्व शत्रूच्या हातांतून सोडविलें, त्याची आठवण केली नाहीं. ३५ आणि यरूब्बाल जो गिदोन, त्याने इस्त्राएलावर जे अवघे उपकार केला होते, त्यांप्रमाणें त्याच्या घराण्यावर त्याची दया केली नाहीं.