२
बोखीम येथें परमेश्वराचा दूत १ परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोबीम येथें येऊन लोकांना म्हणाला, मी तुम्हाला मिसर देशांतुन काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशांत आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही; २ तुम्हीं ह्या देशाच्या रहिवाश्यांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्दा मोडून टाका, असे मा तुम्हांला म्हणालों होतों; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्हीं हें काय केलें? ३ म्हणून मीहि म्हणालों, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला कांट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील. ४ परमेश्वराचा दूत सगळ्या इस्त्राएल लोकांना हें म्हणाला त़ेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला ५ त्यांनीं त्या स्थळाचें नांव बोखीम (आक्रोश करणारें) असें ठेवले. तेथे त्यांनीं परमेश्वराला यज्ञ केले. यहोशवाचा मृत्यू (यहो 24:29-31) ६ यहोशवाने इस्त्राएल लोकांना निरोप दिला तेव्हां ते देश्याचा ताबा घेण्यासाठीं आपआपल्या वतनावर गेले. ७ यहोशवाच्या ह्यातींत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वरानें इस्त्राएलासाठी केलेलीं महान् कार्ये पाहिली होतीं त्यांच्या ह्यातींत लोकांनी परमेश्वराची सेवा केली. ८ परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशेंदहा वर्षाचा होऊन मरण पावला ९ एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथहेरेस येथें त्यांच्या वतनाच्या सीमेवर त्यानीं त्याला मूठमाती दिली १० ती सर्व पिढी पूर्वजास मिळाल्यानंतर जी नवी पिढीं उद्यास आली तिला परमेश्वराची आणि त्यानें इस्त्राएलासाठीं केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती इस्त्राएल लोकांची धर्मभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल ११ इस्त्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीनें वाईट तें करून बआल देवांची सेवा करू लागले; १२ आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्यानें त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्यांचा त्यांनी त्यांग केला व अन्य देवांच्या म्हणजे सभोंवतालच्या राष्टांतील देवांच्या नादीं लागून त्याच्या चरणी लागले आणि तेणेंकडून त्यांनी परमेश्वराला चीड आणली. १३ परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली; १४ म्हणून इस्त्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्यानें त्यांना लुटलें. त्यानें त्यांच्या सभोवतालच्या शत्रुंच्या हवाली केलें; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना. १५ परमेश्वरानें त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणें जेथें जेथें ते कूच करीत तेथें तेथें त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचें अहित होई आणि ते फार संकटात पडत. १६ मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणा-यांच्या हातून सोडवीत; १७ तरी ते आपल्या शास्त्यांचें ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीनें अन्य देवांच्या नादीं लागून त्यांच्या चरणी लागत त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी त्वरित सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाहीं. १८ जेव्हां जेव्हां परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी तेव्हां तेव्हां त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्याच्या ह्यातींत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर लोक जुलुम करीत व त्यांना गांजीत; ह्यामुळें ते कण्हत असत; म्हणून परमेश्वराला त्याची कीव येई. १९ तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करीत व त्यांच्या चरणीं लागून आपल्या वाडवडिलांपेक्षां अधिक बिघडत. ते आपला दुराचार व दुराग्रह सोडीत नसत. २० तेव्हां इस्त्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, मीं ह्या राष्टाच्या पूर्वजांशीं केलेला करार ह्यांने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही; २१ म्हणून यहोशवाच्या मृत्यूंसमयी उरलेल्या राष्टांपैकी कोणालाहि मीं देखील येथूव पुढें त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही; २२ पण त्यांच्याकरवीं मी इस्त्राएलाची परीश्क्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गानें चालत होते त्याप्रमाणेंच ते चालतात कीं नाही हें पाहीन. २३ म्हणून परमेश्वरांने त्य़ा राष्टांना घालवून देण्याची घाई केली नाहीं, त्यांना राहूं दिलें आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिलें नाहीं.