१०
१ शेम, हाम व याफेथ ह्मा नोहाच्या तीन मुलांना जलप्रलयानंतर पुष्कळ मुलगे झाले; त्यांची वंशावळ येणे प्रमाणे:याफेथाचे वंशज २ याफेथाचे मुलगे; गोमर, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते. ३ गोमरचे मुलगे; आष्कनाझ, रीपाथ व तोगार्मा, हे होते. ४ यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम. ५ भूमध्यासमुद्रच्या किनाऱ्याच्या आसपास जी राष्ट्रे झाली ती सर्व याफेथाच्या संततीपासून होती; प्रत्येक मुलाला स्वत:ची जमीन होती ही सर्व कुळे वाढत गेली व त्यांची वेगवेगळी राष्ट्रे झाली. प्रत्येक राष्ट्राची भाषा वेगळी होती. ६ हामचे मुलगे याप्रमाणे होते: कूश, मिस्राईम, पूट व कनान ७ कुशाचे मुलगे: सबा, हवीला, साब्ता, रामा, व साव्तका; आणि रामाचे मुलगे शबा व ददान हे होते. ८ कुशाला निम्रोद नावाचा मुलगा होता, तो पृथ्वीवर महाबलवान व पराक्रमी असा वीरपुरुष होता. ९ तो परमेश्वरापुढे बलवान शिकारी झाला म्हणून इतर माणसांची निम्रोदाशी तुलना करुन “तो माणूस, परमेश्वरासमोर बलवान निम्रोद शिकाऱ्यासारखा आहे” असे म्हणण्याची प्रथा आहे. १० शिनार प्रांतातील बाबेल, एरक, अक्काद व कालहने ही निम्रोदाच्या राज्यातील सुरवातीची शहरे होती. ११ तेथून तो अश्शुरालाही गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईरकालह व रेसन ही शहरे वसवली १२ (रेसन हे शहर, निनवे व मोठे शहर कालह यांच्या दरम्यान आहे.) १३ मिस्राईम याला लूद, अनामीन, लहाकीम, नाप्तुहीम १४ पात्रुस कास्लूह व कप्तोरी हे मुलगे झाले. कास्लूहपासून पलिष्टी लोक आले. १५ कनानाचा पहिला मुलगा सीदोन हा होता; कनान हा हेथचाही बाप होता. कनानापासून उदयास आलेली राष्ट्रे, १६ यबूसी, अमोरी, गिर्गाशी, १७ हिव्वी, आकर्ी, शीनी १८ अर्वादी, समारी व हमाथी ही होती. पुढे कनानाची कुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात पसरली. १९ कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती. २० ही सर्व हाम याची वंशजे होती; हया सर्व वंशजांना स्वत:ची भाषा व देश होते; ती सर्व वेगवेगळी राष्ट्रे झाली. २१ शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता. २२ शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम; २३ अरामाचे मुलगे: ऊस, हूल, गेतेर व मश हे होते; २४ अर्पक्षदास शेलह झाला, शेलहास एबर झाला: २५ एबर यास दोन मुलगे झाले; एकाचे नाव पेलेग होते. पेलेग म्हणजे वाटणी; कारण याच्याच हयातीत पृथ्वीची वाटणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. २६ यक्तानास अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह, २७ हदोराम, ऊजाल, दिक्ला २८ ओबाल, अबीमाएल, शबा, २९ ओफीर, हवीला व योबाब असे मुलगे झाले; हे सगळे यक्तानाचे मुलगे; ३० ते मेशापासून पूर्वेकड़ील डोंगराळ भागात राहात होते. मेशा सफारच्या देशाकडे होते. ३१ हे शेमाचे वंशज होते. कुळे, भाषा, देश व राष्ट्रे याप्रमाणे त्यांची विभागणी अशी आहे. ३२ ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.