११४
१ इस्राएलने मिसर देश सोडला. याकोबाने (इस्राएल) तो परका देश सोडला. २ यहुदा त्याचे निवडक राष्ट्र बनले इस्राएल त्याचे राज्य झाले. ३ लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली. ४ पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या. ५ लाल समुद्रा, तू का पळून गेलास? यार्देन नदी तू का वळलीस आणि का पळून गेलीस? ६ पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात? ७ पृथ्वी प्रभुसमोर, याकोबाच्या देवासमोर थर थर कापली. ८ देवानेच खडकातून पाणी वहायला लावले. देवानेच कठीण खडकातून झरे वाहायला लावले.