१०
१ परमेश्वरा, तू इतक्या दूर का राहतोस? संकटात पडलेले लोक तुला पाहू शकत नाहीत. २ गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात. आणि गरीब लोकांना त्रास देतात. ३ दुष्ट लोक आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल बढाया मारतात. आधाशी लोक देवाला शाप देतात. अशा रीतीने दुष्ट लोक आपण परमेश्वराला तुच्छ मानतो असे दाखवून देतात. ४ वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात. ५ दुष्ट लोक नेहमीच काहीतरी वेडे वाकडे करीत असतात. देवाचे नियम आणि शहाणपणाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात देखील येत नाहीत. देवाचे शत्रू त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. ६ आपले काहीही वाईट होणार नाही असे त्या लोकांना वाटते ते म्हणतात “आपण मजा करु आणि आपल्याला कधीही शिक्षा होणार नाही.” ७ ते लोक नेहमी शाप देत असतात. ते लोकांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. ते सतत वाईट योजना आखत असतात. ८ ते गुप्त जागी लपून बसतात आणि लोकांना पकडण्यासाठी वाट पाहातात. ते दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लपतात ते निष्पाप लोकांना ठार मारतात. ९ ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात. ते गरीबांवर हल्ला करतात. दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात. १० ते दुष्ट गरीब आणि आधीच पीडलेल्या लोकांना पुन्हा पुन्हा त्रास देतात. ११ “देव आपल्याला विसरला, तो आपल्यापासून कायमचा दूर गेला. आपल्यावर काय प्रसंग आलेला आहे हे देव बघत नाही” असा विचार गरीब लोक करतात. १२ परमेश्वरा, ऊठ! आणि काहीतरी कर. देवा, दुष्टांना शिक्षा कर गरीबांना विसरु नकोस. १३ वाईट लोक देवाविरुध्द का जातात? कारण देव आपल्याला शिक्षा करणार नाही असे त्यांना वाटते. १४ परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधारला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर. १५ परमेश्वरा, दुष्टांचे निर्दालन कर. १६ त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे. १७ परमेश्वरा, गरीबांना काय हवे ते तू ऐकलेस. त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना काय हवे ते दे. १८ परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर. दुखी लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस. दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून