८
१ परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे. २ मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस. ३ परमेश्वरा, तू तुझ्या हातांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे मी बघतो तू केलेल्या चंद्र आणि ताऱ्यांकडे मी बघतो. आणि मला आश्चर्य वाटते. ४ लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोकतुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस? ५ परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस. ६ तू लोकांना तू निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे अधिपत्य दिलेस. ७ लोक मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशू यांच्यावर राज्य करतात. ८ ते आकाशातल्या पक्ष्यांवर आणि सागरात पोहणाऱ्या माशावर राज्य करतात. ९ परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.