२३
१ मग परमेश्वराने इस्त्राएलास त्यांच्या चहुंकडल्या सर्व शत्रुंविषयीं विसांवा दिल्ह्यावर बहुत दिवसानी असें झालें कीं यहोशवा वयाने वृध्द झाला. २ यास्तव यहोशवाने सर्व इस्त्राएल, त्यांचे वडील व त्यांचे मुख्य पुरूष व त्यांचे न्यायाधीश व त्यावरले कारभारी यांस बोलावून स सांगितलें, ''मी वयाने वृध्द झालों आहें. ३ आणि तुमचा देव परमेश्वर याने या सर्व राष्ट्रांस तुमच्यापुढून घालवून त्यांस जें केलें, तें अवघें तुम्हीं पाहिलें, कारण कीं तुमचा देव परमेश्वर याने स्वतां तुमच्यासाठीं लढाई केली. ४ पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जीं राष्ट्रें म्या मारून टाकिलीं त्या अवघ्यांचा देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठया समुद्रापर्यंतहि म्या तुम्हास तुमच्या वंशाप्रमाणें वतनासाठीं वाटून दिल्हा आहे. ५ अणखी तुमचा देव परमेश्वर स्वतां त्यांस तुमच्यापुढून घालवील, आणि त्यांस तुमच्यापुढून वतनांतून काढीलच, आणि जसें तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितलें, तसें तुम्ही त्यांचा देश वतनरूपें पावाल. ६ यास्तव मोश्याच्या शास्त्राच्या पुस्तकांत जें लिहिलेलें तें अवघें संभाळून पाळायाला तुम्ही धैर्य धरा; म्हणजे त्यांपासून उजव्याकडे किंवा डाव्याकडे वळूं नका. ७ अणखी तुमच्याजवळ जीं राष्ट्रें उरलेलीं, त्यांमध्ये तुम्ही जाऊं नका, आणि त्यांच्या देवाच्या नांवाची आठवण करूं नका, आणि त्यांची शपथ घालूं नका; त्यांची सेवाहि करूं नका, आणि त्यांच्या पायां पडूं नका. ८ परंतु आजपर्यंत जसें तुम्ही करीत आलां, तसें आपला देव परमेश्वर यासी जडून राहा. ९ कारण कीं परमेश्वराने तुमच्यापुढून मोठीं व पराक्रमी राष्ट्रें वतनांतुन घालविलीं, परतुं तुमची असीं गोष्ट आहे कीं तुमच्यापुढे आजपर्यंत कोणी टिकला नाहीं. १० तुमच्यांतला एक माणूस हजारांची पाठ पुरवील, कारण कीं तुमचा देव परमेश्वर याने जसें तुम्हास सांगितलें, तसा तो स्वतां तुमच्यासाठीं लढतो. ११ तर तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करण्यासाठीं आपल्या चित्ताचा फार संभाळ करा. १२ कारण कीं जर तुम्ही मार्ग किंचितहि सोडाल, आणि जीं तुमच्याजवळ उरलेलीं राष्ट्रें यांसीं म्हणजे या शेषासीं जडून राहाल आणि त्यांसीं सोयरीक करून त्यांच्यामध्यें जाल, आणि ते तुमच्यामध्यें येतील; १३ तर तुम्ही जाणाच जाणा कीं तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांस तुमच्यापुढून वतनांतून अणखी घालविणार नाहीं; आणि जी ही चांगली भूमि तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिल्ही, तिजवरून तुम्ही नाश पावून जाल तोंपर्यंत तीं तुम्हास सांपळा व फांस व तुमच्या कुसींवर छडी व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील. १४ तर पाहा, आज मी सर्व जग जातें त्या वाटेने जात आहें; परंतु तुम्ही आपल्या संपूर्ण मनांत व आपल्या संपूर्ण चित्तांत जाणतां कीं ज्या चांगल्या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने तुमच्याविषयीं सांगितल्या, त्या सर्वातली एकहि गोष्ट गळाली नाहीं; अवघ्या तुम्हास प्राप्त झाल्या; त्यांतली एकहि गोष्ट गळाली नाहीं. १५ तर अस होईल कीं तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास सांगितलेली जी प्रत्येक चांगली गोष्ट, ती जसी तुम्हास प्राप्त झाली तसी परमेश्वर तुम्हास प्रत्येक वाईट गोष्ट प्राप्त व्हावी असी करील; जी ही चांगली भूमि तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिल्ही आहे, तिजवरून तो तुमचा नाश करून तुम्हास घालवी तोंपर्यत असें करील. १६ तुमचा देव परमेश्वर याने जो करार तुमच्याजवळ आज्ञेने केला, त्याचें उल्लंघन जेव्हां तुम्ही कराल, आणि जाऊन दुस-या देवांची सेवा कराल, आणि त्यांच्या पायां पडाल, तेव्हां परमेश्वराचा राग तुम्हावर पेटेल, आणि जा चांगला देश त्याने तुम्हास दिल्हा आहे, त्यावरून तुम्ही नाश पावून लवकर जाल.