२८
१ आणि त्या दिवसात असें झालें की,पलिष्ट्यांनी आपली सैन्ये इस्त्राएलाशीं लढायला, ळढाईसाठीं एकत्र केली, तेव्हां आखीश दावीदाला म्हणाला,तुला आणि तुझ्या मनुष्यांना लढाईस माझ्याबरोबर यायचें हें तूं खचित समज. २ आणि दावीदानें आखीशाला म्हटले, तुझा दास काय करील हे तूं खचित जाणशील,तेव्हां आखीश दावीदाला म्हणाला, याकितां तुला मी आपल्या मस्तकाचा रभक असा कायमचा ठेवीन. ३ शमुवेल तर मेला होता व र्व इस्त्राएलांनी त्याच्यासाठी शोक करून त्याला रामा येथें त्याच्या नगरात पुरलें होतें. आणि भूते ज्यांच्या परीचयाची दोती असल्या लोकांना व जादू गिरांना शौलानें मुळखातून घालवले होते.आणि ४ आणि पलिष्ट्यांनी एकत्र जमून शूनेमात येऊन तळ दिला, आणि शौलानें सर्व इस्त्राएलांस एकत्र करून जमवून गिलबोवा येथें तळ दिला. ५ आणि शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिलें तेव्हां तो भ्याला व त्याचें ङ्रदय फार घाबरें झाले, ६ आणि शौलाने यहोवाला विचारलें, तेव्हां यहोवानें त्याला स्वप्नाकडून किंवा ऊरीमाकडून किंवा भविष्यवाद्यांकडून उत्तर दिलें नाही. ७ मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचें आहे अशा एका बाईचा शोध माझ्यासाठी करा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन, तेव्हां त्याच्या चाकरांनी त्याला म्हटले, पाहा, भूत जिच्या परिचयाचें आहे अशी एक बाई एनदोर येथें आहे. ८ मग शौलानें वेष पालटून निराळीं वस्त्रे अंगात घातली, आणि तो आपणाबरोबरदोन माणसें घेऊन लत्या बाईकडे रात्री गेला , आणि त्याने तिला म्हटले,मी तुला सांगेन त्ला माझ्यासाठी वर आण. ९ तेव्हां ती बाई त्याला म्हणाली, पाहा, शौलाने काय केले आहे, त्यानें भूतें ज्यांच्या परिचयाची आहेत अशा माणसांना व जादूगिरांना देशातून कसें छेदून टाकलें आहे हें तू जाणतोस, तर मी मरावें असे करण्यासाछी तबं कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस? १० तेव्हा शौलाने तिच्याशी शपथ वाहून म्हटले, यहोवा जिवंत आहे, या गोष्टीवरून तुला कांहीं शिक्षा होणारनाही. ११ मग त्या बाईने म्हटले, तुझ्यासाठी मी कोणाला वर आणूं? तेव्हां तो म्हणाला, माझ्यासाठी शमुवेलाला वर आण. १२ आणि त्या बाईने शमुवेलाला पाहिलें तेव्हां ती मोठ्याने ओरडली, मग ती बाई शौलाला म्हणाली, तूनं मला कां फसवले/ कारण तूं शौल आहेस, १३ राजा तिला म्हणाला,भिऊ नको, तूकाय पाहतेस? तेव्हां ती बाई शौलाला म्हणाली, मी देवाला भूमीतून वर येताना पाहतें. १४ मग तो तिला म्हणाला,तो कोणत्या रूपाचा आहे? तेव्हां तो शमुवेल आहे असें शौल समजला, आणि तो आपलें तोंड भूमीकडे सववून नमला. १५ मग शमुवेल शौलाला म्हणाला, तूं मला वर आणून कां त्रास दिला आहे? तेव्हां शौलानें उत्तर केले, मी फार संकटात पडलो आहे, कारण पलिष्टी माझ्याशी लढाई ककरीत आहेत, आणि देव मला सोडून गेला आहे आणि तो भविष्यवाद्याकडून किंवा स्वप्नाकडून मला उत्तर देत नाही; मी काय करावे हेतू मला कळवावें म्हणून मी तुला बोलावले आहे. १६ तेव्हां शमुवेल म्हणाला, यहोवा तुला सोडून गेला आहे व तुझा विरोधी झाला आहे, तर तूं कशाला मला विचारतोस? १७ जसें यहोवानें माझ्याकडून तुला सांगितले तसें त्याने तुझे केले आहे, यहोवाने तुझ्या हातातून राज्य फाडून घेतले काढले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला तें दिलें आहे. १८ कारण तूं यहोवाची वाणी मानली नाही, आणि त्याचा तीव्र क्रोध अमालेकावर घातला मनाही, म्हणून आज यहोवानें तुझे असें केले आहे. १९ आणि यहोवा आस्त्राएलास तुझ्याबरोबर पलिष्ट्यांच्या हाती देईल, उद्यां तूं तुझ्या मुलांसुध्दां माझ्याजवळ असशील. यहोवा इस्त्राएलाचें सैन्य पलिष्ट्यांच्या हातीं देईल. २० तेव्हां शमुवेलाच्या शब्दांमुळे शौल लागलाच आपल्या सर्व अंगाने भूमीवर उपडा पडला, आणि फार भयभीय झाला, व त्याच्यांत कांहीं शक्ति राहिली नाही. कारण सारा दिवस आणि सारी रात्र त्यानें कांही भाकर खाल्ली नव्हती. २१ मग त्या बाईने शौलाकडे येऊन,तो फार घाबरला आहे असें पाहून त्याला म्हटले, पाहा, तुझ्या दासीनें तुझी वाणी ऐकली आहे आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तूं माझ्याशी जे शब्द बोललास ते ऐकले आहेत. २२ तर आतां मी तुला विनंती करते, तूं हि आपल्. दासीचा शब्द ऐक , आणि मला तुझ्यापुढें भाकरीचा तुकडा ठेवूं दे; तो तूं खा, यासाठीं की, तूं वाटेने जाशील तेव्हां तुला शक्ती असावी. २३ परंतु त्यानें नाकारून म्हटले, मी खाणार नाही. मग त्याच्या चाकरांनी व त्या बाईनेहि त्याला आग्रह केला तेव्हां त्यानें त्चा शब्द ऐकला, व तो भूमीनरून उठून पलंगावर बसला. २४ आणि त्या बाईच्या घरात पुष्ट लासरूं होतें तें तिनें मोठ्या घाईने कापले; आणि तिनें पीठ घेतलें व तें मळून त्याच्या भाकरी भाजल्या. २५ मग तिनें ही शौलापुढे व त्याच्या चाकरांपुढें ठेवली आणि तें जेवले; मग ते इठले आणि त्याच रात्री निघून गेले.