२४
१ आणि असें जालें की शौलपलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारा आल्यावर त्याला कोणी सांगिकले की, दावीद एन गेदीच्या रानात आहे. २ तेव्हां शौल क्व इस्त्राएलांतून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्यांच्या खडकावर दावीदाचा व थ्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला. ३ आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला, तेथें एक गुहा होती, तिच्यात शौलआपले पाय झाकायला गेला, आणि दावीद व त्यची माणसें त्या गुहेच्या एगदी आतल्या भांगात बसली होती. ४ तेव्हा दावीदाच्या माणसांनी त्याला म्हटले, यहोवाने तुला सांगितले की, पाहा,मी तुजा शत्रू तुझ्या हाती देईन, आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हा दिवस पाहा. मग दावीदानें उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला. ५ त्यानंतर असें झाले की, दावीदाचे मन त्याला टोचू लागले, कारण त्याने शौलाचें वश्त्र कापून घेतले होते. ६ आणि त्यानें आपल्या माणसांस म्हटले, मी आपल्या धन्यावर, यहोवाच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा, अशी गोष्ट यहोवानें माझ्याकडून घडूं देऊ नये, कारण तो यहोवाचा अभिषिक्त आहे. ७ असें बोलून दावीदानें आपल्या माणसांना दबावून त्यांना शौलावर उठूं दिले नाही, मग शौल उठून गुहेतून निघून वाटेनें चालला. ८ नतर दावीदहि उठून गुहेतून निघाला, आणि शौलाच्या पाठईमागून हाक मारून बोलला, हे माझ्या प्रभू राजा. तेव्हां शौलानें आपल्यामागें वळून पाहिले, आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला, ९ मग दावीदानें शौलाला म्हटले, पाहा; दावीद तुझे वाईट करायला पाहतो, असें जे लोकांचे, बोलणे ते तूंन कशाला ऐकतोस? १० पाहा,आज तूं आफल्या डोळ्यंनीं पाहिलें की यहोवाने गुहेत आज तुला माझ्याहाती दिले होतें, आणि तुला जिवे मारावें असें कोणी मला सांगितले, पण मी तुला सोडून दिले, आणि मी बोललो, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही, कारण तो यहोवाचा अभिषिक्त आहे. ११ आणखी , माझ्या बापा, पाहा, माझ्या हातात तुझ्या वस्त्राचा कांठ पाहा, कारण मीम तुझ्या वस्त्राचा कांठ कापला आणि तुला जिवे मारले नाही, यावरून माझ्याठायी दुष्टाई किंवा फिथुरी नाही, आणि जरी तूं माझा जीव घ्यायला टपून बसतोस तरी मी तुझ्याविरीध्द पाप केले नाही याची खात्री करून पाहा. १२ माझ्यामध्यें व तुझ्यामध्यें यहोवा न्याय करो; माझा सूड यहोवा तुझ्यावर उगवो, परंतु माझा हात तुझ्यावर पडणार नाही १३ दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे, परंतु माझा तुझ्यावर पडणार नाही. १४ कोणाच्यामागें इस्त्राएलाचा राजा निघून आला?तूं कोणच्या पाठीस लागतोस? मेलेल्या कुत्र्याच्यामागें काय? १५ यास्तव सहोवा न्यायाईश होईन माझ्यामध्यें व तुझ्यामध्यें न्याय करो, हें पाहून तो माझा वाद करो, आणि तुझ्या हातून मला सोडवो. १६ आणि असे झालें की, दावीदाने शौलाशी हे शब्द लबोलणें सेपवळ्यावर शौल म्ङणाला, माझ्या मुला दावीदा,ही तुझी वाणी आहे काय?मग शौल गळा काढून रडला, १७ आणि तो दावीदाला म्हणाला, माझ्यापेक्षां तू अधिक न्यायी आहेस, कारण तूं माझें बरे केले, आहेस, परंतु मी तुझे वाईट केले आहे. १८ आणि तूं माझ्याशी चांगले वर्तन करतोस हें तूं आज उघड केले आहे. कारण यहोवाने मला तुझ्या हाती दिलें होतें तेव्हां तूं मला जिवे मारले नाही. १९ कोमा माणसाला त्याचा वैरी सांपडला तर तो त्ला चांगल्या रीतीने वाटेस लेवील काय? तर तूं आज जें माझे बरें केलें त्याबद्दल यहोवा तुला उत्तम प्रतिफळ देवो. २० आणि आतां पाहा, मी जाणतों की तूं खचित राजा होशील, आणि इस्त्राएलांचें राज्य तुझ्या हाती स्थापित होईल. २१ म्हणून आतां तूं माझ्याशी यहोवाची शपथ वाहा की, तूं माझ्यामागे माझे संतान नाहीसें करणार नाहीस, आणि माझ्या बापाच्या कुळांतून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस. २२ तेव्हां दावीदानें शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरीं गेला, आणि दावीद व त्याचीं माणसें गडांत चढून गेलीं.