२१
१ आणि दावीद नोब यैथे अहीमलेख याजकाजवळ आला, आणि अहीमलेख कांपत,कांपत दावीदाला भेटायला आला, व त्याला म्हणाला,तूं एकटा कां आलास आमि तुझ्याबरोबर कोणी कां नाहा? २ तेव्हां दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, राजानें मला कांही काम करायला आज्ञापिलें आहे, आणि त्याने असे म्हटले की ज्या कामाविषयी मी तुला पाठवतो, व जें मी तुला आज्ञापिले आहे,ते कोणाला समजू देउ नको;आणि तरुणांनी अमक्या अमक्या ठिकाणी असावें म्हणून मी त्यांना नेमले आहे. ३ नतर आता तुझ्या हातांत काय़ आहे? सांच भाकरी किंवा जे कांही असेल तें मला माझ्या हाती दें. ४ तेव्हां याजकानें दावीदाला उत्तर देऊन म्हटले, माझ्याजवळ कांही सामान्य भाकर नाही, तर पवित्र भाकर आहे;जर तरुणांनी आपणांस बायकांपासबन दूर राखलें असेल तर ती घ्यावी. ५ दावीदानें याजकाला उत्तर देऊन म्हटले, खचित हे तीन दिवस झाले,मी निघालों तेव्हापासून बायका आम्हापासून दूर आहेत, आणि तरुणांची पात्रें पवित्र आहेत;आणि ती भाकर जरी पात्रात आज पवित्र केली होती तरी कांही प्रकारे सामान्य आहे. ६ मग याजकानें त्याला पवित्र भाकर दिली, कारण ऊन भाकर ठेवावी म्हणून जी समत्रतेची भाकर यहोवाच्या समोरून त्या दिवशी काढलेली होती तिच्यावाचून दुसरी भाकर तेथे न्हती. ७ आणि त्या दिवशी शौलाच्या चाकरातील एक माणूस तेथें यहोवाच्या पुढे थांबवलेला असा होता; त्याचे नाव दवेग; तो अदोमी होता;तो शौलाच्या खिल्लाऱ्यामध्यें मुख्य होता. ८ आणि दावीद अहीमलेखाला म्हणाला येथें तुझ्याजवळ भाला किंवा तरवार नाही काय?राजाचे काम निकडीचे आहे म्हणून मी आपल्या हाती आपली तरवार किंवा आपली शस्त्रे घेतली नाहीत. ९ तेव्हां याजक म्हणाला,गल्याथ पलिष्टी, ज्याला तूं एलाच्या खोऱ्यांत जिवे मारलें त्यांची तरवार पाहा, ती एफोदाच्या मागे वस्त्रात गुंडाळलेली आहे, ती तूं घेणार तर घे, कारण तिच्यावाचून दु सरी येथें नाही, दावीद म्हणाला, तिच्यासारखी दुसरी नाही, ती मला दे. १० आणि त्या दिवशी दावीद उठला व शौलाच्या भीतीमुळे पळून गथाचा राजा अखीश याच्याकडे गेला. ११ तेव्हां अखीशाचे दास त्याला म्हणाले,हा दावीद , देशाचा राजा आहे की नाही:शौलाने हजार व दावीदाने दहा हजार मारले आहेत, असें ते त्याच्याविषयी गाउन एकमेकांना म्हणत नाचत होते की नाही? १२ आणि दावीद हे शब्द आपल्या मनात ठेवून गथाचा राजा आखीश याच्यापुढे पार भ्याला. १३ मग त्यांच्यापुढे त्याने आपली वर्तणूक पालटून त्यांच्यासमोर वेड घेतले, आणि त्यानें कवाडाच्या फळ्यांवर रेघामारल्या व आपलीलाळ आपल्या दाढीवर गळूं दिली. १४ तेव्हां आखीश आपल्या दासांना म्हणाला, पाहा, हा वेडा आहे, असें तुम्हाला दिसतें, तर कशासाठी तिम्ही त्याला माझ्याकडे आणलें? १५ वेडीमाणसें मला कमी आहेत म्हणून तुम्ही याला माझ्याकडे वेडेपण करायला आणले काय?यानें माझ्या घरात यावें काय?