१९
१ यानंतर शाऊलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, ''दावीदाला जिवे मारावे.'' २ तथापि शाऊलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती; आणि योनाथानाने दावीदाला म्हटलें की, ''माझा बाप शऊल तुला जिवें मारायास पाहत आहे, म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा. ३ आणि मी जाऊन ज्या शेतात तूं आहेस तेथें आपल्या बापाबासीं उभा राहीन, आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापासीं संभाषण करीन, आणि जे पाहीन ते तुला कळवीन. ४ तेव्हां योनाथानाने आपला बाप शाऊल याला दावादाविषयी बरें म्हटले, आणि तो त्याला बोलला की, '' राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करु नये, कारण की त्याने तुझीं फार चांगली कृत्यें केलीं आहेत. ५ त्यानेही आपलें शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिलें, आणि परमेश्वराने अवघ्या इस्त्राएलासाठी मोठे तारण केलें, तें तूं पाहून हर्षित झालास; तर दावीदाला निष्कारण मारितांना निर्दोष रक्त तूं कां पाडसीलं?'' ६ तेव्हां शाऊलाने योनाथानाची विनंती मानिली आणि शाऊलाने असी शपथ वाहीली कीं रपमेश्वराची शपथ मी करिंतो कीं त्याला मारणार नाही.'' ७ मग योनाथानाने दावीदाला बोलाविले, आणि योनाथानाने त्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या; आणि योनाथानाने दीवादाले शाऊलाजवळ आणिलें, आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारिखा होता. ८ यानंतर आणखी लढाई झाली, आणि दावीदाने जाऊन पलीष्ट्यांसी लढून त्यांता फार मोड केला, आणि ते त्याच्यापुढे पळाले. ९ मग देवापासून दुष्ट आत्मा शाऊलाला लागला, आणि तो आपला भाला हातीं धरुन आपल्या घरीं बसला असतां दावीद हाताने सारंगी वाजवीत होता. १० तेव्हा शाऊल भाल्याने दावीदाला भिंतीसीं लावायास झटला, परंतु तो शाऊलासमोरुन निसटला, आणि भाला भिंतीस लागला, आणि दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री राखिला. ११ मग दावीदावर टपून सकाळीं त्याला जिवें मारावें म्हणून शाऊलाने त्याच्या घरास दूत पाठविले, आणि दावीदाची बायको हें वर्तमान त्याला सांगून असें बोलली कीं, ' जर या रात्री आपल्या जिवाजे रक्षण तूं करीत नाहींस तर सकाळी तूं जिवे मारिला जासील.'' १२ तेव्हां मीखालीने दावीदाला एका खिडकीतून उतरिलें, आणि त्याने पळून जावून आपल्या जिवांचे रक्षण केले. १३ मग मिखालीने एक मुर्ती घेऊन पलंगावर ठेविली, आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले. १४ आणि जेव्हां शाऊलाने दूत दावीदाला धरायास पाठविले तेव्हां तिने म्हटले कीं, 'त्याच्या जिवाला बरें वाटत नाही.'' १५ मग शाऊलाने दावादाला पाहायास दूत पाठवून म्हटले कीं,'' म्यां त्याच्या जीवे मारावा म्हणून त्याला पलंगावर मजपासाीं आणा.'' १६ आणि ते दूत घरांत आले असतां पाहा पलंगावर मुर्ती व तिच्या डोकीखालं बकऱ्यांच्या केसांची उशी होती. १७ तेव्हां शाऊलाने मीखालीला म्हटले कीं, '' त्वां मला कां फसविलें आणि माझ्या वैऱ्याने निर्भय पळून जावें म्हणून त्याला लावून दिले?'' मग मीखाल शाऊलाला म्हणाली, '' त्याने मला म्हटले कीं, मला जाऊं दे, म्या तूला कां मारावे.?'' १८ याप्रमाणे दावीदाने पळून आपल्या जिवाचे रक्षण केले, आणि शमुवेलाजवळ राम्यामध्यें येऊन त्याने आपणाला जें अवघे शाऊलाने केले होते ते सांगितले; तेव्हां तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले. १९ मग शाऊलाला कोणी णसें ण्हटलें की, पाहा दावीद पाम्यांतल्या नायोथांत आहे.'' २० तेव्हां शाऊलाने दावीदाला धरायास दूत पाठविले, परंतु, भविष्यवाद्यांची मंडळी स्तवन करिता आणि शमुवेल त्यांवर नेमलेला उभा राहतां, हीं जेव्हां त्यांनी पाहीले तेंव्हा देवाचा आत्मा शाऊलाच्या दूतांवर आला, आणि तेही देवाजा स्तवन करु लागले. २१ मग ते शाऊलाला सांगितले असता त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही स्तवन करुं लागले; मग शाऊलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही स्तवन करुं लागले. २२ तेव्हां तोहि राम्यास जायास निघाला, आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येउन त्याने असें विचारिले की, '' शमुवेल व दावीद कोठें आहेंत?'' मग कोणीएकाने म्हटलें,''पाहा, तो राम्यांतल्या नायोथांत आहेत.'' २३ तेव्हा तो राम्यांतल्या नायोथांत जाऊं लागला, आणि देवाचा आत्मा त्याजवरही आला, आणि तो जातांना राम्यांतल्या नायोथांत पोहोंचला तोपर्यंत स्तवन करीत गेला. २४ मग त्यानेही आपलीं अंगवस्रे काढून शमुवेलापुढे स्तवन केले, आणि तो पडून त्या सर्व दिवसीं आणि त्या सर्व रात्री उघडा राहीला; या कारणास्तव ते म्हणाले,'' शाऊलही भविष्यवाद्यांमध्ये आहे कीं काय?''