१४
१ आणि एकें दिवशीं असे झालें कीं, शौलाचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुणाला म्हणाला, चल, आपण पलिष्यांचे ठाणें जे पलीकडे आहे त्याकडे जाऊ.परंतु त्याने आपल्या बापाला हें सांगितलें नाहीं. २ आणि शौल गिब्याच्या शेवटल्या भागी मिग्रोनांत डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता, त्याच्याजवशचे लोक सुमारें सहाशें होते; ३ आणि एलीचा मुलगा फिनहास याचा मुलगा इखाबोद याचा आऊ एहीटूब याचा मुलगा अहीया, शिलोत एफोद नेसलेला यहोवाचा याजक, हाहि होता. तेव्हायोनाथान गेला हें लोकांना माहित नव्हतें. ४ आणि योनाथान ज्या घाटांनी पलिष्ट्याच्या ठाण्यावर जाण्यास पाहत होता च्यांच्या एका बाजूला खडकाळ शिखर व दुसऱ्या बाजूला खडकाळ शिखर होतें; त्यांतल्या एकांचें नांव बोसेस व दुसऱ्याचें नांव सेने असें होतें; ५ एक शिखर उत्तरेकडे मिखमाशासमोर उठलेलें व दुसरें दक्षिणेकडे गिब्यासमोर उटलेले होतें. ६ आणि योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला,चल, आपण त्या बेसुनत्यांच्या ठाण्यावर जाऊ, कदाचित यहोवा आमच्यासाठीं कार्य करील; कारण बहुतांनी किंवा थोडक्यांनी तारयला यहोवाला काही एडचण नाही. ७ आणि तायचा शस्त्रवाहक त्याला म्णाला, जें तुज्या ह्रदयांत आहे तें सगळे कर.च तूं फीर; पाहा, मी तुझ्या ह्रदयाप्रमाणें तरझ्याबरोबर आहें. ८ तेव्हां योनाथान म्हणाला,पाहा, आपण त्या माणसाकडे जाऊनत्यास प्रगट होऊ. ९ जर ते आम्हास म्हणताल, आम्ही तुम्हांकडे येऊ तोपर्यत थांबा,तर आम्ही आपल्या ठिकाणी उभे राहूं, वर त्याच्याकडे जाणार नाही. १० परंतु जर तें म्हणतील कीं, वर आम्हांकडे या,तर आम्ही वर डाऊं, कारण यहोवानें त्यांना आमच्या हाती दिलें आहे; हीच आम्हांला खूण होईल. ११ मग त्या दोघांनी आपणांला पलिष्ट्यांच्या ठाण्यातील माणसांना प्रगट केलें, आणि पलिष्ट्यांनी म्हटलें, पाहा, ज्या गुहांमध्यें इब्री लपले होते त्यांतून ते निघून येत आहेत. १२ आमि ठाण्याच्या माणसांनी योनाथान व त्याचा शस्त्रवाहक यांना उत्तर देऊन म्हटले, वर आम्हांकडे या, म्हणजे आम्ही तुम्हांला काही गोष्टी दाखवूं. तेव्हां योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, माझ्यामागे वर ये, कारण यहोवानें त्यांना इस्त्राएलाच्या हाती दिले आहे. १३ मग योनाथान आपल्या हातांनी व आपल्या पायांनी चढून गेला आणि त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागोमाग चढून गेला. तेव्हाते योनाथानासमोर पडले, व त्याच्यामागून त्याचा श्त्राहक त्यांना मारीत गेला. १४ आ जो पहिला वध योनाथानाने केला त्यात एक बिघा भूमीवर सुमारें वीस माणसें पडलीं. १५ आणि छावणीत, शेतात व सर्व लोकांमध्यें कंप झाला; तें ठाणेव लुटारूहि कांपले व भूमि कापली; तो तर देवाकडून झालेला कंप होता. १६ तेव्हां बन्यामीनातील गिब्यांतल्या शौलाच्या पाहरेकऱ्यांनी पाहिलें, आणि पाहा, समुदाय विरून जात होता व ते इकडे तिकडे चालले होते. १७ मग शोल आपल्याबरोबरच्या लोकांना म्हणाला,आमच्यामधून कोण गेला आहे? टीप घेऊन पाहा. मग त्यांनी टीप घेतली, तेव्हां पाहा, योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तेथे नव्हते. १८ आणि शौलानें अहीयाला म्हटले, देवाचा कोश इकडे आण.कारण त्या समयी देवाचा कोश इस्त्राएलाच्या संतानांच्यामध्ये होता. १९ आण असें झाले की, शोल याजकाशी वोलत असता पलिष्याच्या छावणातला गलबला वाढत वाढत मोठा झाला, तेव्हा शौलानें याजकाला म्हटले, आपला हात काढून घे. २० तेव्हा शौल व त्याच्याजवळते सर्व लोक जमून लढाईला गेले; आणि पाहा, प्रत्येक माणसाची तरवार आपल्या सोबत्याच्या विरुध्द झली म्हणून फार मोठी दाणादाण झाली. २१ तेव्हां जे इब्री पूर्वी पलिष्ट्याच्यामध्ये राहिले होते, जे चहूकडून त्याच्याबरोबर छावणीत गेले होते तेहि शोल व योनाथान याच्याबरोबर जे इस्त्राएल होते त्याच्याशी मिळाले. २२ आणि जी इस्त्राएली माणसे एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशांत लपली होती ती सर्व, पलिष्टी पळत आहेत हें ऐकून, लढाईत त्याच्या पाठीस लागली. २३ असें यहोवानें त्यादिवशी इस्त्राएलाचें तारण केले, आणि लढाई बेथ-आवेनाकडे गेली. २४ त्या दिवशीं इस्त्राएली पुरुष कष्टी झाले, कारण शौलानें लोलांना शपथ घालून म्हटलें होते,संध्याकाळपर्यत, मी आपल्या शत्रूचा ,ड घेईपर्यत, जो माणूस कांही खाईल त्याला य़ाप लागो. याकरितां लोकांतल्या कोणी कांहीं खाल्लें नाहा. २५ आणि देशातले सर्व लाक वनांत आले आणि भूमीवर मध होता; २६ आणि वनांत लोक आले, तेव्हा पाहा,मधाचा ओघ वाहत होता;परंतु कोणी आपला हात आपल्या तोंडाला लावला नाही, कारण लोक षपथेला भीत होते. २७ परंतु जेव्हां आपल्या बापानें लोकांस शपथ घातली तेव्हां योनाथानाने ती ऐकली न्हती, म्हणूनत्यानें आपल्या हाती जी काठी होती तिचें टोक पुढें करून मधाच्या मोहळात घालून आपल्या तोंडास लावले; मग त्याचे डोळे टवटवीत झाले. २८ तेव्हां लोकांतील एकाने उत्तर करून म्हटले,तुझ्या बापानें लोकांना शपथ घालून निक्षून सांगितलें की,जो कोणी आज कांही अन्न् खाऊल त्याला शाप लागो.लोक तर थकले होते. २९ तेव्हा योमाथान म्हणाला,माझ्या बापाने देशास उपद्रव केला आहे; मा हा थोडा मध चाखला आणि पाहा, माझे डोळे कसे यमटवीत झाले आहेत? ३० जर लोकांनी आपल्या शत्रूंच्या मिळालेल्या लुटीतून आज इच्छेप्रमाणें खाल्ले असतें तर कितीतरी बरे होते! कारण आतां पलिष्यांचा आधिक मोठा घात झाला नसता काय? ३१ आणि त्या दिवशीं ते मिखामाशापासून अयालोनापर्यत पलिष्ट्यांना मारीत गेले, मग लोल फार थकलेले होते. ३२ तेव्हां लोक लुटीवर तुटून पडले, आणि मेंढरे व गुरे व वासरें घेऊन भूमीवर कापून रक्तासुध्दां लोक खाऊं लागले. ३३ तेव्हां कोणी शोलास अले सांगितलें की पाहा, लोक रक्तासुध्दां खाऊन यहोवाच्याविरुध्द पाप करतात. त्यानें म्हटलें, तुम्ही दगा करतां; मोठा दगड लोटून आज माझ्यापाशीं आणा. ३४ आणि शौलानें म्हटले,लोकांमध्यें धावत जाऊन त्यांना सांगा की प्रत्येक माणसानें आपला बैल व प्रत्येक माणसाने आपली मेंझरें माझ्यापाशीं आणून येंथे कापावी, मग खावें; रक्तसुध्दां खाऊन यहोवाच्याविरुध्द पाप करू नका.तेव्हां सर्व लोकांनी, प्रत्येक माणसाने आपापले बैल आपल्या हातानें त्या रात्री आणून तेथें कापले. ३५ मग शौलानें यहोवाला अर्पणें अर्पिण्यासाठीं वेदी बांधली; जी पहिली वेदी त्यानें .होवासा अर्पणें अर्पिण्यासाठी बांधली ती हीच होती. ३६ मग शौल बोलला, आपण रात्रीं पलिष्ट्यांच्यामागे खाली जाऊन उद्यां उजाडेपर्यत त्याच्यांतली लूट घेऊं, आणि आपण त्याच्यांतील एकहि माणूस उरूं देऊ नये. ते म्हणाले,जें तुला बरें वाटेल तें कर. मग याजकानें म्हटलें, आपण येथें देवाजवळ येऊ. ३७ मग शौलाने विचारलें की, मी पलिष्ट्यांत्यामागें खाली जाऊ कायय़ तूं त्यांना इस्त्राएलांच्या हाती देशील काय? परंतु त्या दिवशीं त्यानें कांही उत्तर दिले नाही. ३८ मग शौल म्हणाला, एहो लोकांच्या सर्व पुढाऱ्यांनो, इकडे या, आणि हें पाप कशाने घडलें आहे तें शोध करून पाहा; ३९ कारण यहोवा, जो इस्त्राएलाचें रारण करतो, तो जिवंत आहे; म्हणून हें पाप माझा मुलगा तोनाथान याच्या पदरीं सांपडलें तरी तो खचित मरेल. पण सर्व लोकांतील कोणीहि त्याला उत्तर दिले नाही. ४० मग त्यानें लर्व इस्त्राएलांस म्हटलें, तुम्ही का बाजूला व्हा, आणि मी व माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होऊं. लोक तर शौलाला म्हणाले, तुला बरे वाटेल ते कर. ४१ मग शौल यहोवा इस्त्राएलाचा देव त्याला म्हणाला, खरे तें दाखीव. तेव्हां योनाथान व शौल धरले गेले, आणि लोक सुटले. ४२ मग शौलानें म्हटले, माझ्यामध्यें व योनाथान माझा मुलगा याच्यामध्यें पम पाडा. तेव्हा योनाथान धरला गेला. ४३ मग शौल योनाथानाला म्हणाला, तूं काय केलें आहे ते सांग, योनाथान त्याला म्हणाला, मी आपल्या हातांतल्या काठीच्या टोकानें थोडा मध चाखला खरा आणि पाहा, मला मेलें पाहिजे. ४४ तेव्हा शौल म्हणाला, देव तसें व त्यापेक्षां अधिकहि करो; योनाथाना तुला तर खचित मेले पाहिजे. ४५ मग लोक शौलाला म्हणाले, ज्याने इस्त्राएलात हे मोठे तारण केले तो योनाथान मरावा काय? तें तर दूरच असो! यहोवा जिवंत आहे,याच्या डोक्याचा एक केसही भूमीवर पडणार नाही,कारण याने देवाच्यासंगती काम केले आहे. या प्रकारे लोकांनी योनाथानाला सोडवलें, म्हणून तो मेला नाही. ४६ मग शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचें सोडून वर गेला; पलिष्टीहि आपल्या ठिकाणीं गेले. ४७ शौलानें तर इस्त्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतलें; त्यानें चहूकडे आपल्या सर्व षत्रूशी म्हणजे,मवाबी यांच्याशी,व अम्मोनाच्या संतानाशी, व अदोमी यांच्याशीव सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढी केली, आणि जेथें कोठे तो गेला तेथें त्यानें त्यांना त्राजून सोंडलें. ४८ आणि त्यानें पराक्रम करून अमालेकाला मार दिला, आणि इस्त्राएलांना त्यांच्या लुटणाऱ्यांच्या हातांतून सोडवलें. ४९ आणि योनाथान वइश्र्वी व मलकीशुवा हे शौलाचे मुलगे होते, व त्याच्या दोघी मुलींची नांवें ही होती;प्रथम जन्मलेली मेरब, व धाकटीचे नांव मीखल. ५० आणि शौलाच्या बायकोचे नाव अहीनवाम, ती अहीमासाची मुलगी होती, आणि शौलाचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापति होता. ५१ आणि शौलाचा बाप कीश, व अबनेराचा बाप हे अबियेलाचे मुलगे होते. ५२ आणि शौलाच्या सर्व दिवसात पलिष्ट्यांशी कठीण लढाई चालू होती; आणि शौल कोणी बलवान किंवा कोणी शूर पाही तेव्हां तो त्याला आपल्याजवळ ठेवून घेई.