१३
१ शौल राज्य करूं लागला तेव्हां तो चाळीस वर्षचा दोता, आणि दोन वर्षे इस्त्राएलावर राज्य केल्यानंतर, २ शौलानें इस्त्राएलांतून तीन हजार पुरुष निवडून घेतले;त्यांतले दोन हजार सौलाबरोबर मिखमाशांत व बेथेलाच्या डोंगरात होते, आणि योनाथोनाबरोबर बन्यामीनाच्या गिब्यात एक हजार होते; आणि बाकीच्या लोकांना त्यानें त्यांच्या डेऱ्याकडे पाठवलें. ३ आमि गिब्यात पलिष्ट्यांचे जे ठाणे होतें तें योनाथानानें हाणलेआणि पलिष्ट्यांनी त्याविषयी ऐकलें. तेव्हां शौलाने सर्व मुलखात शिंग वाजवून म्हटले,इब्री ऐकोत. ४ आणि शौलानें पलिष्ट्यांचे ठाणें हाणलें, आणि पलिष्ट्यांनी इस्त्रएलास तुच्छ मानले, असें सर्व इस्त्राएलांनी ऐकले; आणि लोक शौलाजवळ गिलगालात एकत्र जमले. ५ मग तीन हजार रथ व सहा हडार घोडेस्वार व समुद्राच्या वाळूसारखे पुष्कळ लोक घेईन पलिष्टी इस्त्राएलाशी लढाई करायला जमले, आणि त्यांनी मिखमाशात येऊन बेथ- आवेनासमोर तळ दिला. ६ मग आपण संकटात आहों इस्त्राएलांनी पाहिलें. कारण लोक दुखित झाले होते. तेव्हां लोक गुहा व झाड्या व खडक व कडे व विवरेंयामध्यें लपून राहिले. ७ आणि कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले; पण शौल गिलगालात तसाच राहिला, आणि सर्व लोक त्याच्यामागें कापत चालले . ८ आणि शमुवेलानें नेमलेल्या मुदतीप्रमाणें तो सात दिवस थांबला, परंतु शमुवेल गिलगालास आला नाही आणि लोक त्याच्यापासूननिघून जाऊं लागले. ९ तेव्हां शौलानें म्हटले, होमार्पणें व शांत्यर्पणें इकडे माझ्यापाशीं आणा. मग तय्नें होमार्पण अर्पिलें. १० आणि असें झालें की, त्याने होमार्पण अर्पिण्याची समाप्ति केल्यावर, पाहा,शमुवेल आला, आणि शौल त्याला सलाम करायला बाहेर निघून गेला, ११ तेव्हां शमुवेल म्णाला, तूं काय केले आहे? शौलाने म्हटलें, कारण मी पाहिलें की लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले, आणि नेमलेल्या दिवसाच्या आंत तूं आला नाहीस आणि पलिष्टी मिखमाश येथएं जमले. १२ म्हणून मी म्हटले,पलिष्टी खाली गिलगालास माझ्यावर येत आहेत, आणि मी यहोवाची विनंती अद्याप केली नाही, म्हणून मी स्वत:ला भाग पाडून होमार्पण अर्पिले. १३ आणि शमुवेल शौलाला म्हणाला, रूं मूर्खपण केले. यहोवा तुझा देव यानें जी अज्ञा तुला आज्ञापिली ती तूं मानली नाही; मानली असती तर आतां यहोवानें इस्त्राएलावर तुझे राज्य निरंतर स्थापले असते. १४ परंतु आतां तुझे राज्य चालू राहणार नाही; यहोवानें आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपति होण्यास नेमलें आहे; कारण यहोवाने जे तुला आज्ञापिलें ते तूं पाळलें नाही. १५ मग शमुवेल उठून गिलगालाहून बन्यामीनातील गिबा येथें गेला; आणि शौलानें आपणाजवळ जे लोक होते त्यांची टीप घेतली; ते सुमारें सहाशें होते. १६ आणि शौल व त्याचा मुलगा योनाथान व त्याच्याबरोबरचे लोक बन्यामीनांतील गिब्यात राहिले.आणि पलिष्ट्यांनी मिखमाशात छावणी केली. १७ आणि पलिष्ट्यांच्या छावणीतून लुटारू तीन टोळ्या करून निघाले; एक टोळी एफ्राच्या वाटेनें शुवालाच्या प्रांताकडे गेली, १८ आणि दुसरी टोळी बेथ- होरोनाच्या वाटेनें गेली, आणि आणखी एक टोळी जो प्रांत सबोईम खोऱ्याकडला आहे त्याच्या वाटेनें रानाकडे वळली. १९ तव्हां इस्त्राएलाच्या सर्व देशात कोणी लोहार मिळेना, कारण पलिष्ट्यांनी म्हटलें होतें, कदाचित इब्री आपणांस तरवारी किंवा भाले करून घेतील. २० आणि सर्व इस्त्राएली एकएक आपला फाळ व आपली कुदळ व आपली कुऱ्हाड व २१ आपलें दाताळी यांसाठी व अरीला धार देण्यासाठी कानस दोती. २२ आणि लढाईच्या दिवशी असें झालें की, जे लोक शौल व योनाथान यांच्याजवळ होते त्यांच्यांतल्या कोणाच्याहि हाती तरवार व भाला नव्हता; पण शौल व त्याचा मुलगा योनाथान यांच्याजवळ होत. २३ आणि पलिष्ट्याचें ठाणें निघून मिखमाशाच्या उताराकडे गेलें.