५
१ आणि पलिष्टयांनीं देवाचा कोश घेतला होता, तो त्यांनी एबन- एजराहून अश्दोदास नेला. २ आणि पलिष्टयांनीं देवाचा कोश घेतला, तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला. ३ मग अस्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले तेव्हां पाहा, यहोवाच्या कोशापुढें दागोन भूमीवर पालथा पडला आहे. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेउन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. ४ मग ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर पाहा, यहोवाच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे,आणि दागोनाचें डोकें व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तोडलेले उंबऱ्यावर पडले आहेत;दागोनाचे धड तेवढें त्याला राहिले होतें. ५ याकरितां आजपर्यत दागोनाचे याजक व दागोनाच्या घरांत जाणारे ते अश्दोदकर दागोनाच्या उंबऱ्यावर पाय ठेवत नाहीत. ६ मग अश्दोदकरेवर यहोवाचा भारी हात ढाला व त्यानें त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला म त्याच्या सीमेला मूळव्याधीकडून हाणलें. ७ तेव्हां अश्दोदकर हें पाडून म्हणाले,इस्त्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्यें राहू नये, कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवावर भारी झाला आहे. ८ मग त्यांनीं माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना आपणाकडे एकवट करून म्हटलें, इस्त्राएलाच्या देवाच्या कोशाचे आम्दी काय करावे? ते बोलले,इस्त्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा,मग त्यांना इस्त्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला. ९ मग असें झाले कीं, त्यामनी तो तेथें नेल्यावर, त्या नगरातीलीं सहान मोठीं माणसें हाणली आणि त्यांना मूलव्याधी सागला. १० मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; आणि असें झालें की, देवाचा कोश एक्रोन येथें आला तेव्हा एक्रोनकर ओरडून बोलले, आम्हांला व आमच्या लोकांना मारायला इस्त्रालाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे. ११ मग त्यांनी माण, पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व सरदांना एकवट करून म्हटलें, इस्त्रेलाच्या देवाचा कोश पाठवून द्या;त्यानें आम्हाला व आमच्या लोकांना मारू नये म्हणून त्यानें आपल्या ठिकाणीं परत जावें.कारण सर्व नगरास मारक उपद्रव झाला होता;तेथें देवाचा हात फार भारी झाला होता. १२ आणि जी माणसें मेली नाहीत त्यांस मूळव्याधीनं हाणलें, आणि नगराचा आकांत वर आकाशाकडे गेला.