४
१ .आणि शमुवेलाचा ळब्द सर्व इस्त्राएलांवर होता.इस्त्राएल तर, पलिष्ट्यांशी लढायला गेले,आणि ते एबन-एजराजवळ उतरले व पलिष्टि अफेक येथें उतरले. २ . मग पलिष्ट्यांनी इस्त्राएलाविरुध्द लढाई मांडली, आणि लढाई होऊं लागल्यावर इस्त्राएल पलिष्ट्यापुढे पराभव पावले;आणि तांनी रानांत फौजेतले सुमारे चार हजार पुरूष मारले. ३ मग लोक छावणीत आल्यावर इस्त्रेलांचे वडील म्हणाले, आज यहोवाने आम्हांस पलिष्य्यांपुढे कां मारले.? आपण यहोवाच्या कराराचा कोश शिलाहून आपल्याकडे आणूं, अशासाठी कीं, त्याने आम्हांमध्ये येऊन आमच्या शत्रूच्या हातातून आमचे तारण करावे. ४ मग लोकांनी शिलोकडे माणसे पाठवलीं आणि करूंबाच्या वर राहणारा सैन्यांचा यहोवा याच्या कराराचा कोश तेथून आणला:; आणि तेथें एलीचे दोन मुलगे, हफनी व फिनहास हे देवाच्या कराराच्या कोशाबरोबर होते. ५ आणि यहोवाचा कराराचा कोश छावणीत आला सर्व इस्त्राएल अशा मोठ्या शब्दानें ओरडले कीं भूमिहि दणाणली. ६ तेव्हा पलिष्टी या मोठ्या ओरडण्याचा शब्द ऐकून म्हणाले, इब्र्यांच्या छावणीत हा मोठा पुकारा कशाचा असेल?मग त्यांना कळले की,यहोवाचा कोश छावणीत आला आहे. ७ तेव्हा पलिष्टी भ्याले,कारण ते म्हणाले, आम्हास हायहाय!कारण अशी गोष्टअद्याप कधीं घडली नाही. ८ आम्हास हायहाय! या समर्थ देवांच्या हातांतून आम्हास कओण सोडवील?ज्यांनी मिसऱ्यांना रानांत सर्व प्रकारच्या पीडांकडून हाणलें ते देव हेच आहेत. ९ अहो पलिष्ट्यांनो, धैर्य धरा व शूर व्हा; जसे इब्री तुमचे ताकर झाले तसे तुम्ही त्यांचे चाकर होउं नये म्हणून शूर होऊन लढा. १० ,मग पलिष्टी लढले.तेव्हा इस्त्राएलांचा पराभव हून ते प्रत्येक आपपल्या डेऱ्याकडे पळून गेले वफार मओठा घात झाला ,कारण इस्त्राएलांचे तीस हजार पायदळ पडले. ११ आणि त्यांनीं देवाचा कोश घेतला णि एलीचे मुलगे हफनीव फिनहास हे मेले. १२ त्यादिवशी एक बन्यामिनी माणूस आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथें धावत आला. १३ आणि तो आला तेव्हा पाहा,एली रस्त्याच्या बाजूला आपल्या आसनावर बसून वाट पहात होता,कारण देवाच्या कोशाकरिता त्याचे ह्रदय कांपत होतें; आणि त्या माणसाने नगरात येऊन ते वर्तमान सांगितले तेव्हां सर्व नगर मोठ्यानें ओगडूं लागलें. १४ आणि एलीनें ओरडण्याचाशब्द ऐकून म्हटलें, हा गोंगाटाचा शब्द काय आहे? मग त्या माणसानें उतावळीने येऊन एलीला सांगितलें. १५ तेव्हां एली अठ्ठ्याणव वर्षाचा होता, आणि त्याचे डोळे मंद ढाल्यानें त्याला दिसत नव्हतें?. १६ . आणि तो माणूस एलीला म्हणाला, मी सैन्यातून पळून आलों. मग हा म्हणाला,माढ्या मुला,काय ढालें आहे,? १७ तोव्हां ज्याने वर्तमान आणले होतें त्याने उत्तर देऊन म्हटले,इस्त्राएल पलिष्ट्यापुढून पळाले, व लोकांचा मोठा वध झाला,आणि तुझे दोघे मुलगे हफनी व फिनहास हे मेले,आणि देवाचा कोश नेलेला आहे. १८ आणि असेंझाले की त्यानें, देवाचा कोश, असे उच्चारलें इतक्यात हा आपल्या आसनालरून दाराच्या बाजूला मागें पडला,आणि तो म्हातारा व जड माणूस असल्यानें त्याची मान मोडून तो मेला.आणि त्यानें चाळीस वर्षे इस्त्राएलाचा न्याय केला होता. १९ तेव्हां त्याची सून फिनहासची बायको गरोदर होती, ती प्रसूत होणार पोती; देवाचा कोश नेलेला आहे व आपला सासरा व आपला नवरा हे मेले आहेत, असें वर्तमान ऐकताच ती लवून र्रसूत झाली, कारण तिला कळा लागल्या होत्या. २० आण तिच्या मरणाच्या वेळे, ज्या बाया तिच्याजवळ उभ्या होत्या त्यांनी तिला म्हटलें, भिऊ नको, कारण तूं मुलाला जन्म दिला आहे. परंतु तिनें उत्तर केले नाहीं व लक्ष दिले नाही. २१ आणि मुललाचे नांव ईखाबोद(म्हणजे, वैभव कोठें?)असें ठेवून म्हटलें की, इस्त्राएलापासून वैभव निघून गेलें आहे, कारण देवाचा कोश नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा नवरा हे मेले होते. २२ आणि ती म्हणाली, इस्त्राएलापासून वैभव गेलें आहे, कारण यहोवाचा कओश नेलेला आहे.