३०
१ आणि असें झाले की,दावीद व त्याची माणसें तिसऱ्या दिशीम सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावरव सिकलागावर घाला घातला होता, आणि त्यांनीं सिकलाग हाणून अग्नीने जाळले होतें. २ आणि त्यांतल्या स्त्रिया व त्यांत जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेलें होते;त्यांनी कोणालाहि जिवें मारले नव्हते, पण जे त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले. ३ तर दावीद व त्याची माणसें गांवाजवळ आलीं तेव्हां पाहा, तें अग्नीने जाळले. आहे,आणि त्याच्या बायका आणि त्यांचे मुलगे व त्यांच्या मुली धून नेलेल्या आहेत अयें त्यांनी पाहिलें. ४ तेव्हां दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इरके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. ५ आणि दावीदाच्या दोघी बायका, अहीनवाम इज्रेलीन वपूर्वी नाबाल कर्मेली याची बायको होती ती अबीगईल, ह्या धरून मेलेल्या होत्या. ६ तेव्हां दावीद मोठ्या संकटात पडला, कारण त्याला धोंडमार करावा असें लोक बोलूं लागले; कारण सर्व माणसांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदानें यहोवा आपला देव याच्याकडून आपणाला सबल केले. ७ मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथारानें एफोद दावीदाकडे आणले. ८ आणि दावीदानें यहोवाला विचारलें,तो म्हणाला, जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो, तर मी त्यांना आटोपीन काय?आणि त्यानें त्याला उत्तर दिलें कीपाठीस लाग, कारण खचित तूं त्यांना आटोपशील व सर्वांना सोडवून घेशील. ९ मग दावीद व त्याच्याकडले सहाशे पुरुष जाऊन बसोर नदीजवळ पोहचले. जे मागें ठेवले होते ते तेथें राहिले. १० तेव्हां दावीद व चारशें माणसें शत्रूच्या पाठीस लागली, कारण दोनशें माणसें तेथें थांबली; ती इतकी थकली होतीं कीं त्यांच्यांने बसोर नदीच्या पलिकडे जाववेना. ११ आणि रानांत एक मिसरी त्यांना आढळला तेव्हा त्यांनी . त्याला दावीदाकडे आणलें. मग त्यांनी त्याला भाकर दिली आणि ती त्यानें खाल्ली, व त्यांनी त्याला पाणी पाजलें. १२ मग त्यांनी अंजिरांच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्याला दिले, मग त्यानें खाल्ल्यावर त्याच्या जिवांत जीव आला, कारण तीन दिवस व तीन रात्री त्यानें भाकर खाल्ली नव्हती, पाणीहि तो प्.ला नव्हता. १३ तेव्हा दावीद त्याला म्हणाला, तूं कोणाचा? कोठला आहेस? त्याने म्हटले, मी मिसरी तरुण एका अमालेकी माणसाचा ताकर आहें: तीन दिवसांमागे मी दुखण्यात पडलों म्हणून माझ्या धन्यानें मला सोडले. १४ आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या हक्षिण प्रदेशावर घाला घातला, आणि सिकलाग आम्ही अग्नीनें जाळले. १५ मग दावीद त्याला म्हणाला, तूं मला या टोळीकडे खाली नेशील काय? त्यानें म्दटलें, तूं मला जिवे मारणार नाहीस व माझ्या धन्याच्या हातीं मला देणार नाहीस अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुला या टोळीकडे खाली नेईन. १६ आणि त्यानें त्यांना खालीनेलें, तेव्हां पाहा, ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व तनाचत हेत, कारण त्यांनीं पलिष्याच्या देशातून व यहूद्याच्या देशांतून पुषकळलूट घेतली होती. १७ आणि दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यत त्यांना मारी, गेला; आणि त्यांच्यातील चारशें तरुण माणसें उंटावर बसून पळाली, त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीअक सुटला नाही. १८ आणि जें सर्व अमालेक्यांनी नेले होतें ते दावीदानें आपल्या दोघी बायकासोडवल्या. १९ आणि लहान किंवा मोठा, किंवामुलगे किंवा मुली, किंवा लूट, किंवा जें सर्व त्यांनी नेले होतें त्यातलें कांहीच त्यांना उणे पडले नाही; दावीदाने सर्व माघारी आणलें. २० आणि अवघी मेंढरें व गुरें दावीदानें घेतली; ती त्यां नी इत्तर सामानापुढें हाकून म्हटले, ही दावीदाची लूट आहे. २१ मग जी दोनशें माणसें थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्यानें बसोर नदीपाशी ठेवले होतें त्यांच्याकडे दावीद आला, तेव्हां ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांना भेटायला निघाली आणि दावीदाने त्या माणसांजवळ येऊन त्यांना कुशलप्रश्र्न केला. २२ तेव्हां जीं माणसें दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती ती सर्व असें म्हणूं लागली की, ही माणसें आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातलें कांही आम्ही त्यांना देणार नाही; प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊं; मग त्यांनी ती घेईन निघूनजावें. २३ तेव्हां दावीद म्हणाला, माझ्या भावांनो, जें यहोवाने दिलें आम्हांला दिले आहे त्याचे असें करूं नका, कारण त्यानें आम्हाला संभाले, वजी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली. २४ या गोष्टींविषयीं तुमचें कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वांटा होईल; त्यांना सारखाच वांटा मिळेल. २५ आणि त्या दिवसापासून पुढें तसें झाले; त्यानें तसा नियम व रीत इस्त्राएलांत आजर्यत करून ठेवली. २६ आणि दावीद सिकलागास आला तेव्हां त्यानें यहूदाच्या वडिलांकडे, आपल्या मित्रांकडे, लुटीतलें कांहीं पाठवून सांगितले की, पाहा, यहोवाच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे. २७ जे बेथेलांत होते त्यांना, जे दक्षिण प्रदेशातील रामाथांत होते त्यांना, व जे यरीरांत होते त्यांना, २८ आमि जे अरोएरांत होते त्यांना, व जे सिफमोथांत होते त्यांना, व जे एष्टमोंत होते त्यांना, २९ आणि जे राखासांत होते त्यांना,व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्ना, वजे केनी यांच्या नगरांत होते त्यांना, ३० आणि जे हर्मात होते त्यांना, व जे कोरशांनांत होते त्यांनाव जे अथाखांत होते त्यांना, ३१ आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथें दावीद व त्याचीं माणसें फिरत असत त्या सरिव ठिकाणांकडे त्यानें लुटीतलें कांहां पाठवलें.