११
१ मग नाहाश अम्मोनी यानें जाऊन याबेश- गिलादास वेढा घातला. तेव्हां याबेशांतल्या सर्व माणसांनी नाहाशाला म्हटले, आम्हाशी करार कर, म्हणजे आम्ही तुझी सेवाकरू. २ तेव्हां नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला,मी तुम्हाशीं अशा अटीवर तो करार करीन की, मी तुम्हातील प्रत्याकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्त्राएलावर निंदा आणीन. ३ तेव्हां याबेशाच्या वडिलांनी त्याला म्हटले, आम्हांला सात दिवसांचा एवकाश दे;म्हणजे इस्त्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू;मग जर आमचे तारण करायला कोणी येत नसला तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ. ४ आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे य़ेऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या तेव्हां सर्व लोक हेल काढून रडले. ५ आणि ,पाहा, शोल रानातून ढोरांच्यामागें चालत आला, आणि शोल म्हणाला,लोकांना कास झाले म्हणून ते रडतात? तेव्हां त्यांनी त्याला याबेशातील माणसांचे वर्मान सांगितले. ६ तेव्हां शौलाने ह्या गोष्यी ऐकल्यावर देवाचा आत्मा पराक्रमानें त्याच्यावर आला, आणि त्याचा राग फारच पेटला. ७ मग बैलांची जोडी घोऊन त्याने त्यांचे तुकडे केले, आणि दूतांच्या हातून ते इस्त्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितलें की, जो कोणी शौलाच्यामागे व शमुवेलाच्यामागें येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात योईल. तेव्हां यहोवाचें भय लोकांवर पडले वते एकाच माणसासारखे निघून आले. ८ मग त्यानें बेजेकांत त्यांची नोंद घेतली आणि इस्त्राएलाचीं संतानें तीन लाख होती व यहूद्यांची माणसे तीस हजार होती. ९ तेव्हां जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटलें, याबेश -गिलादाच्या माणसांस असें सांगा कीं, उद्यां सूर्य तापेल तेव्हां तुमचें तारण होईल. मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसें सांगितले; तेव्हां ते आनंद पावले. १० मग याबेशांतील माणसांनी म्हटले,उद्यां आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ,तेव्हा तुम्हाला बरे दिसेल तें आमचे करा. ११ मग सकाळी असें झाले की,शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या, आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी तळ्याच्यामध्यें येऊन दिवस तापेर्यत अम्मोन्यांना मारले; आणि असें झाले की, जे उरले त्यांतले दोन देखील एका ठिकाणी मिळाले नाहीत अशी त्यांची दाणादाण झाली. १२ मग लोक शमुवेलाला म्णाले ,शौल आम्हावर राज्य करील काय असें जो जो बोलला तो कोण आहे? ती माणसें काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवें मारू. १३ तेव्हा शौल बोलला, आज कोणा माणसालाहि जिवें मारायचें नाही, कारण आज यहोवाने इस्त्राएलांत तारण केले आहे. १४ तेव्हां शमुवेलानें लोकांस म्हटले, चला आपण गिलगालास जाऊन तेथें नव्यानें राज्य स्थापू. १५ मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी यहोवाच्यासमोर शौलाला राजा केले, आणि तेथे यहोवाच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले;तेव्हां तेथे शौल व इस्त्राएलाची सर्व माणसें यांना फार आनंद केला.