6
गेर्षेान, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
अम्राम, इसहार, ईब्रोन आणि उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
अहरोन, मोशे, मिर्याम हे अम्रामचे मुलगे.
नादाब, अबीहू, एलाजार व इथामार हे अहरोनचे मुलगे. एलाजाराचा मुलगा फिनहास, फिनहासचा अबीशूवा. अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी. उज्जीने जरह्या याला जन्म दिला आणि जरहयाने मरायोथला. मरायोथ हा अमऱ्या याचा बाप. आणि अमऱ्या अहीटूबचा. अहीटूबचा मुलगा सादोक. सादोकचा मुलगा अहीमास. अहीमासचा मुलगा अजऱ्या. अजऱ्याचा मुलगा योहानन. 10 योहाननचा, मुलगा अजऱ्या (शलमोनाने यरुशलेममध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.) 11 अजऱ्या याने अमऱ्या याला जन्म दिला. अमऱ्याने अहीटूबला. 12 अहीटूबचा मुलगा सादोकचा मुलगा शल्लूम. 13 शल्लूमचा मुलगा हिल्कीया. हिल्कीयाचा मुलगा अजऱ्या. 14 अजऱ्या म्हणजे सरायाचे वडील. सरायाने यहोसादाकला जन्म दिला.
15 यहूदा आणि यरुशलेम यांचा परमेश्वराने पाडाव केला तेव्हा यहोसादाकला परागंदा व्हावे लागले. या लोकांना युध्दकैदी म्हणून दुसऱ्या देशात जावे लागले. परमेश्वराने हे सर्व नबुखद्नेस्सरच्या हातून घडवले.
16 गर्षोम, कहाथ आणि मरारी हे लेवीचे मुलगे.
17 लिब्री आणि शिमी हे गर्षोमचे मुलगे.
18 अम्राम, इसहार, हेब्रोन, उज्जीयेल हे कहाथचे मुलगे.
19 महली आणि मूशी हे मरारीचे मुलगे.
लेवी कुळातील घराण्यांची ही नावे. वडलांच्या घराण्याप्रमाणे त्यांची वंशावळ दिलेली आहे.
20 गर्षोमचे वंशज असे: गर्षोमचा मुलगा लिब्नी. लिब्नीचा मुलगा यहथ. यहथया मुलगा जिम्मा. 21 जिम्माचा मुलगा यवाह. यवाहचा इद्दो. इद्दोचा मुलगा जेरह. जेरहचा यात्राय.
22 कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर. 23 अस्सीरचा मुलगा एलकाना आणि एलकानाचा मुलगा एब्यासाफ. एब्यासाफचा मुलगा अस्सीर. 24 अस्सीरचा मुलगा तहथ. तहथचा मुलगा उरीएल. उरीएलचा उज्जीया. उज्जीयाचा शौल.
25 अमासय आणि अहीमोथ हे एलकानाचे मुलगे. 26 एलकानाचा मुलगा सोफय. सोफयचा मुलगा नहथ. 27 नहथचा मुलगा अलीयाब. अलीयाबचा यरोहाम. यरोहामचा एलकाना. एलकानाचा मुलगा शमुवेल. 28 थोरला योएल आणि त्याच्या पाठीवरचा अबीया हे शमुवेलचे मुलगे.
29 मरारीचे मुलगे याप्रमाणे: मरारीचा मुलगा महली. महलीचा लिब्नी. लिब्नीचा मुलगा शिमी. शिमीचा उज्जा. 30 उज्जाचा मुलगा शिमा शिमाचा हग्गीया आणि त्याचा असाया.
31 कराराचा कोश तंबूत ठेवल्यावर दावीदाने परमेश्वराच्या घरात गायनासाठी काही जणांची नेमणूक केली. 32 पवित्र निवास मंडपात हे लोक गायनसेवा करीत. यरुशलेममध्ये शलमोनाने परमेश्वराचे मंदिर उभारले तोपर्यंत त्यांनी ही सेवा केली. आपल्या कामाच्या नियमानुसार ते वागत.
33 गायनसेवा करणाऱ्यांची नावे अशी:
 
कहाथ धराण्यातील वंशज: हेमान हा गवई. हा योएलचा मुलगा. योएल शमुवेलचा मुलगा. 34 समुवेल एलकानाचा मुलगा. एलकाना यरोहामचा मुलगा. यरोहाम अलीएलचा मुलगा. अलीएल तोहाचा मुलगा. 35 तोहा सूफचा मुलगा. सूफ एलकानाचा मुलगा. एलकाना महथचा मुलगा. महथ अमासयचा मुलगा. 36 अमासय एलकानाचा मुलगा. एलकाना योएलचा मुलगा. योएल अजऱ्याचा मुलगा. अजऱ्या सफन्याचा मुलगा. 37 सफन्या तहथचा मुलगा. तहथ अस्सीरचा मुलगा. अस्सीर एव्यासाफचा मुलगा. एव्यासाफ कोरहचा मुलगा. 38 कोरह इसहारचा मुलगा. इसहार कहाथचा मुलगा. कहाथ लेवीचा आणि लेवी इस्राएलाचा मुलगा.
39 आसाफ हेमानचा नातलग होता. हेमानच्या उजवीकडे आसाफ उभा राहून सेवा करीत असे. आसाफ हा बरेख्या याचा मुलगा. बरेख्या शिमाचा मुलगा. 40 शिमा मिखाएलचा मुलगा. मिखाएल बासेया याचा मुलगा. बासेया मल्कीया याचा मुलगा. 41 मल्कीया एथनीचा मुलगा, एथनी जेरहचा मुलगा जेरह हा अदाया याचा मुलगा. 42 अदाया एतानाचा मुलगा. एथाना हा जिम्मा याचा मुलगा. जिम्मा शिमीचा मुलगा. 43 शिमी यहथ याचा मुलगा. यहथ हा गर्षोम याचा मुलगा. गर्षोम लेवीचा मुलगा.
44 मरारीचे वंशज हेमान आणि आसाफ यांचे नातलग होते. गाताना त्यांचा गट हेमानच्या डावीकडे उभा राहत असे. एथान हा किशीचा मुलगा. किशी अब्दीचा मुलगा. अब्दी मल्लूखचा मुलगा. 45 मल्लूख हशब्याचा मुलगा. हशब्या अमस्याचा मुलगा. अमस्या हा हिल्कीया याचा मुलगा. 46 हिल्कीया अमसीचा मुलगा. अमसी बानीचा मुलगा. बानी शेमर मुलगा. 47 शेमेर महलीचा मुलगा. महली मूशीचा मुलगा, मूशी मरारीचा मुलगा मरारी हा लेवीचा मुलगा.
 
48 हेमान आणि आसाफ यांचे नातलग हे लेवी घराण्यातील होते. मंदिराच्या पवित्र निवासमंडपात काम करायला लेवींची निवड झाली होती. पवित्र निवासमंडप म्हणजे देवाचे घरच. 49 होम करायच्या आणि धूप जाळायच्या वेदींवर धूप जाळायची परवानगी मात्र फक्त अहरोनच्या वंशजातील लोकांनाच होती. अहरोनचे हे वंशज देवाच्या अत्यंत पवित्र गाभाऱ्यात नेमलेले सर्व काम करत. इस्राएली लोकांना प्रायश्र्चित्त देऊन शुध्द करण्याचे समारंभही ते करत. मोशे याने सांगितलेले नियम आणि विधी ते पाळत. मोशे देवाचा सेवक होता.
50 अहरोनचे वंशज पुढीलप्रमाणे: अहरोनचा मुलगा एलाजार. एलाजारचा मुलगा फिनहास. फिनहासचा मुलगा अबीशूवा. 51 अबीशूवाचा मुलगा बुक्की. बुक्कीचा मुलगा उज्जी. उज्जीचा मुलगा जरह्या. 52 जरह्याचा मुलगा मरायोथ. मरायोथचा मुलगा अमऱ्या. अमऱ्याचा मुलगा अहीटूब. 53 अहीटूबचा मुलगा सादोक आणि सादोकचा मुलगा अहीमास.
54 अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला. 55 हेब्रोन नगर आणि त्याच्या आसपासचे शिवार त्यांना मिळाले. 56 त्यापुढची जागा आणि हेब्रोन नगराजवळची खेडी यफून्नेचा मुलगा कालेब याला मिळाली. 57 अहरोनच्या वंशजांना हेब्रोन हे नगर मिळाले. हेब्रोन हे आश्रयनगर होते. याखोरीज त्यांना लिब्ना, यत्तीर, एष्टमोवा, 58 हीलेन, दबीर, 59 आशान, युत्ता, आणि बेथ-शेमेश ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली. 60 बन्यामीनच्या वंशातील लोकांना गिबा, अल्लेमेथ, अनाथोथ ही नगरे त्यांच्या आसपासच्या शिवारांसकट मिळाली.
कहथच्या वंशजांना तेरा नगरे मिळाली.
61 कहथच्या उरलेल्या काही वंशजांना मनश्शेच्या अर्ध्या वंशांतून दहा नगरे मिळाली.
62 गर्षोमच्या वंशजातील कुळांना तेरा नगरे मिळाली. ही त्यांना इस्साखार, आशेर, नफताली आणि बाशान मधील काही मनश्शे या वंशांच्या घराण्यांकडून मिळाली.
63 मरारीच्या वंशजांतील कुळांना बारा नगरे मिळाली. रऊबेनी, गाद आणि जबुलून यांच्या घराण्यांतून, चिठ्ठ्या टाकून त्यांना ती मिळाली.
64 ही नगरे व भोवतालची जमीन इस्राएल लोकांनी मग लेवींना दिली. 65 यहूदा, शिमोन आणि बन्यामीन यांच्या घराण्यातून, चिठ्ठया टाकून, लेवी वंशजांना ती ती नगरे देण्यात आली.
66 एफ्राईमच्या वंशजांनी काही नगरे कहाथच्या वंशजांना दिली. ती ही चिठ्ठ्या टाकून ठरवण्यात आली. 67 त्यांना शखेम नगर मिळाले. शखेम हे आश्रयनगर होय. गेजेर, 68 यकमाम, बेथ-होरोन, 69 अयालोन आणि गथ-रिम्मोन हीही नगरे आसपासच्या जमिनीसकट त्यांना मिळाली. एफ्राईमच्या डोंगराळ भागातील ही गावे होत. 70 मनश्शेच्या अर्ध्या वंशातून इस्राएलांनी आनेर आणि बिलाम ही गावे शिवारांसकट कहाथच्या वंशाच्या लोकांना दिली.
71 गर्षोमच्या वंशजांना बाशानमधील गोलान आणि अष्टारोथ हे त्यांच्या भोवतालच्या शिवारासकट, मनश्शेच्या अर्ध्या वंशाकडून मिळाले.
72-73 त्याखेरीज गर्षोमच्या वंशजांना केदेश, दाबरथ, रामोथ, आनेम ही नगरे भोवतालच्या शिवारासकट इस्साखारच्या वंशजांकडून मिळाली.
74-75 माशाल, अब्दोन, हूकोक, रहोब ही नगरे, शिवारासकट, आशेर घराण्याकडून गार्षोन कुटुंबांना मिळाली.
76 गालीलमधले केदेश, हम्मोन, किर्याथाईम ही शिवारासकट नगरे नफतालीच्या वंशातून गर्षोन वंशाला मिळाली.
77 आता उरलेले लेवी म्हणजे मरारी लोक त्यांना योकनीम, कर्ता, रिम्मोनो आणि ताबोर ही नगरे जबुलूनच्या घराण्याकडून मिळाली. नगराभोवतीची जमिनही अर्थातच मिळाली.
78-79 या खेरीज मरारींना वाळवंटातील बेसेर, याजा, कदेमोथ, मेखाथ ही नगरे भोवतालच्या शिवारांसकट, रऊबेनी लोकांकडून मिळाली. हे रऊबेनी यार्देन नदीच्या पूर्वेला, यरीहोजवळ, राहत असत.
80-81 मरारी कुटुंबांना गाद वंशाकडून गिलादमधील रामोथ, महनाइम, हेशबोन, याजेर ही नगरे देखील आसपासच्या शिवारासकट मिळाली.