स्तोत्रसंहिता 12
प्रमुख गायकासाठी शेमीनिथ सुरावरचे दावीदाचे स्तोत्र.
1 परमेश्वरा, मला वाचव!
सर्व चांगले लोक आता गेले आहेत.
आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही.
2 लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात.
प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो.
3 परमेश्वराने खोटे बोलणारे ते ओठ कापून टाकले पाहिजेत
परमेश्वराने मोठमोठ्या गोष्टी सांगणाऱ्या जभा छाटून टाकल्या पाहिजेत.
4 ते लोक म्हणतात, “आम्ही योग्य प्रकारे खोटे बोलून मोठे होऊ
कसे बोलायचे ते आम्हाला समजते म्हणून
आमचा कोणीही मालक होऊ शकणार नाही.”
5 परंतु परमेश्वर म्हणतो, “वाईट लोक गरीबांकडून वस्तू चोरतात ते
अगतिक लोकांकडून वस्तू काढून घेतात.
परंतु आता मी तिथे उभा राहून त्या गरीब असहाय्य लोकांची बाजू घेईन
6 परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत.
ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.
ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.
7 परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे.
त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर.
8 ते दुष्ट लोक आपण कुणीतरी मोठे आहोत असा आव आणतात पण ते खरोखर खोट्या दागिन्याप्रमाणे आहेत.
ते खूप किमती वाटतात पण फारच स्वस्त\f + \fr 12:8 \fk ते … स्वस्त शब्दश:“दुष्ट लोक माणसाजवळच्या क्षुद्र वस्तूप्रमाणे ऐट दाखवतात.”\f* असतात.